corona .jpg 
विदर्भ

CoronaVirus : या जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळून येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. सदरील संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्यात आला आहे.

याबाबत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाबाबत सामाजिक माध्यमांमधून अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. 

गर्दी होणारे कार्यक्रम रद्द
परदेशीय नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय नागरिक यांच्याबाबत संबंधित पोलिस स्टेशन प्रभारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी माहिती द्यावी. आरोग्य विभागाने कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करावी. जनजागृतीपर साहित्य प्रकाशित करून वितरित करावे. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र ॲब्युलन्सची व्यवस्था करण्यात यावी. औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री, औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविणे याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कोरोना विषाणू प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. 

कर्मी गर्दी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात
तसेच लग्न, धार्मिक कार्यक्रम यामध्येसुद्धा कर्मी गर्दी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी स्वत:हून धार्मिक कार्य, लग्न समारंभ टाळावेत. याबाबत मंगल कार्यालय व्यवस्थापकांना सूचना देण्यात येत आहेत. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी प्रत्येकाने हात स्वच्छ धुवावे, आपला स्वच्छ रुमाल वापरावा. रुमाल ताबडतोब स्वच्छ करावा. गर्दीमध्ये जाणे टाळावे, असे आवाहनही यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

कायद्यान्वये ही होऊ शकते कारवाई
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील 2005 कलम 34 नुसार जर एखाद्या व्यक्तीमुळे एखादी कुठली आपत्ती ओढावणार आहे, असे लक्षात आले, तर अशा व्यक्तीच्या हालचालींवर प्रतिबंध करता येतो. या कायद्याच्या अनुषंगाने आदेश काढले असल्यास व त्याचे पालन न केल्यास एका वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.

अफवांवर विश्वास ठेवू नये
जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात अर्धवट माहिती असलेले, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. असे कोणतेही संदेश कुणीही अधिकृत स्त्रोतांकडून खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नका. तसेच आवश्‍यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करावे. चुकीचे मेसेज पाठवू नये. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचे निर्देश प्राप्त झालेले आहे. तरी कुणीही कोरोना विषाणू संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये. हेल्पलाइन क्रमांक : राष्ट्रीय कॉल सेंटर 911123978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष 020 26127394 व टोल फी क्रमांक 104 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT