CoronaVirus: The search for a three comes from abroad 
विदर्भ

CoronaVirus: विदेशातून आलेल्या तिघांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

अकोला : विदेशातून आलेल्या 46 पैकी 43 जणांचा तपास झाला आहे. मात्र तिघांचा अद्याप तपास लागलेला नाही. या तिघांनी वा त्यांच्या नातेवाइकांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील विविध भागात प्रार्थना स्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना, दर्शन आदींसाठी लोकांचे एकत्रिकरण टाळावे व तसे लोकांना आवाहन  मंदिर ट्रस्टी, धर्मगुरु, मौलवी यांनी आपल्यास्तरावरुन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
शहरातील विविध मंदिर,मशिद, गुरुद्वारा, चर्च, जैन मंदिरांचे प्रमुख पुजारी, गुरु, ट्रस्टी, धर्मगुरु,मौलवींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी  नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते. 

समुपदेशन कक्षात 21 जणांची नोंद
सर्वोपचार रुग्णालयात 17 मार्च रोजी स्थापन करण्यात आला होता. कोरोना विषाणू समुपदेशन कक्षात दोन दिवसांत 21 जणांची नोंद करण्यात आली असून, त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. कोरोना विषाणू समुपदेशन कक्षाची स्थापना झाल्यापासून वैद्यकीय तपासणीसाठी लोक स्वत: पुढाकार घेत आहेत. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वैद्यकीय चाचणीपूर्वी त्यांनी केलेल्या 14 दिवसांतील प्रवासाबाबतही माहिती घेतली जात आहे.

कोरोनामुळे अनधिकृत इमारतीविरुद्धची मोहीम स्थगित
महानगरपालिकेतर्फे शहरातील अनधिकृत इमारतींविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र मनपाची यंत्रणा सध्या कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने ही मोहीम थांबविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे

हेल्पलाईन क्रमांकावर करा नोंदणी
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कोरोना विषाणू नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा विदेशातून आलेल्या व्यक्तींनी नियंत्रण कक्षात नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले. यासाठी 0724-2421718 हा हेल्प लाईन क्रमांक दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : सनातन हिंदू धर्मात वराह जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व- नितेश राणे

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT