file photo
file photo 
विदर्भ

दिग्रस : सर्वसाधारण सभेत संतप्त नगरसेवकाकडून तोडफोड 

सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव होऊन तसेच अनेकवेळा तक्रार करूनदेखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारून त्यांच्या खुर्च्यांची तोडफोड खुद्द नगरसेवकाने केले. ही घटना नगर परिषद दिग्रसच्या पाणीपुरवठा विभागात बुधवारी (ता.30) घडली. 


शहरातील मोतीनगर प्रभागात गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मोतीनगरचे नागरिक तसेच नगरसेवक सै. अक्रम सै. उमर यांनी अनेकवेळा पालिकेत तक्रार केली होती. तसेच सर्वसाधारण सभेतसुद्धा सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून अनेक उपाययोजनांबाबत ठरावसुद्धा झाला. परंतु, संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना मोतीनगरवासींना करावा लागत होता. हा त्रास असह्य झाल्याने मोतीनगरच्या महिलांनी पालिकेत धडक दिली. पालिकेत त्या ठिकाणी मोतीनगरचे नगरसेवक सै. अक्रम उपस्थित होते. त्यांनी पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सै. अक्रम यांचा पारा अनावर झाला. त्यामुळे त्यांनी दुमजली इमारतीवरून कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करून त्या खाली फेकल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT