cotton 
विदर्भ

Video :शेतक-याच्या पांढ-या सोन्याला मिळतोय मातीमोल भाव, एका शेतक-याने व्यथा मांडली गीतातून

दिपक खेकारे

चंद्रपूर (गडचांदूर) : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाने दरवर्षीच गांजलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली. शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला भाव  नसल्याने, तुम्ही खाता कोंबडीचे पाय अन दादा शेतकऱ्यांचे काय असा टोला कापूस विकायला गेलेल्या शेतक-याने स्वलिखित गीतातून जनप्रतिनिधीला लगावला आणि आपली व्यथा मांडली आहे
शेतकऱ्यांचे काय रे दादा शेतकऱ्याचे काय?
अशा बोलातून यांनी व्यथा मांडली.  कोरपना बाजार समितीअंतर्गत सोनूर्ली येथील जिनिंगमध्ये शेतकरी कापूस विकायला गेले असता कवडीमोल भावांनी कापसाची खरेदी केली गेली. इथे शेतकऱ्यांना खायला अन्न मिळतं नाही आणि लोकप्रतिनिधी चारचाकीने फिरून बंगल्यात राहतात. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला कधी मिळणार अशी व्यथा स्वतः शेतकरी असणारे मधुकर चुणारकर यांनी  स्वलिखित गीतातून मांडली.


कोरोना आजाराच्या सावटाने संपूर्ण देशात टाळेबंदी आहे. देशातील बाजारपेठ सुध्दा बंद आहे. अशा परिस्थितीत  पांढऱ्या सोन्याचा भाव बघून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे वेचाईला लागलेल्या खर्चापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी केला जात आहे.
 नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणतात त्याप्रमाणे अस्मानी संकटातून कसा बसा सावरून शेतक-याने काही पिके हातात घेतली परंतु त्यांच्या मालाला आलेला भाव लावलेल्या किमीतपेक्षा कमी असल्याने  शेतकरी  हवालदिल झाला आहे.

सविस्तर वाचा - दुकान उघडताच नागरिकांनी लावल्या रांगा, चाळीस दिवसांनंतर मिळाली संधी
काही शेतकऱ्यांकडे पूर्वीचा तर काहींकडे शेवटचा कापूस शिल्लक आहे परंतु वाटेल त्या भावाने शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जात आहे १५०० ते २००० रुपये क्विंटल असा भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे
शासन व जनप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व्यथा गीतातून मांडली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT