cotton is not getting proper price in market  
विदर्भ

पांढरे सोने हमीभावाच्या प्रतीक्षेत; शेतकऱ्यांच्या घरीच खराब होतोय कापूस

रुपेश खैरी

वर्धा : दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांचा कापूसही शेतातून घरी आला आहे. परंतु, पणन महासंघ आणि सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या कापसाला साडेचार ते पाच हजार रुपये दर देण्यात येत आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा लागली आहे..

शेतकऱ्यांचा कापूस शेतात फुटला असताना आलेल्या पावसामुळे तो बऱ्याच प्रमाणात ओला झाला. हवामान खात्याने पुन्हा दिलेल्या चेतावणीमुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी होता त्या अवस्थेत कापूस वेचला. या कापसात बऱ्याच प्रमाणात पावसामुळे आद्रता असल्याने तो घरी साठवून ठेवल्यावर काळा येणे सुरू झाले आहे. हा कापूस आणखी खराब होण्यापेक्षा तो विकण्यास शेतकरी पसंती देत आहे. पण, त्यांना भाव मिळत नसल्याने त्यांची चांगलीच पंचाईत होत आहे.

सोयाबीन गेल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी आलेला कापूस विकण्याची तयारी दर्शविताच ग्रामीण भागात कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांच्या घरासमोर घिरट्या घालू लागले. यात काही शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यांना त्यांचा कापूस दिला. यात त्यांना साधारणत: हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. यामुळे शिल्लक असलेल्या कापसाला हमीभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असून याकरिता शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

पणन महासंघ, सीसीआय शोधतेय मुहूर्त

शेतकऱ्यांचा कापूस घरी पडून आहे. तो घरीच खराब होण्याची वेळ आली असताना सीसीआय आणि पणन महासंघाच्या वतीने अद्यप खरेदी केंद्र सुरू केले नाही. यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या दारी जावे लागत आहे. यात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पाच हजाराच्या आसपास दर मिळत आहे. अशात येत्या दिवसात खासगी बाजारातही कापसाचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहे. यातच जर हमीकेंद्र सुरू झाले तर कापसाचे भाव आणखी वाढेल असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT