cotton rate Cross of ten thousand subsidy protection amravti
cotton rate Cross of ten thousand subsidy protection amravti sakal
विदर्भ

कापसाची झळाळी टिकविण्याचे आव्हान

कृष्णा लोखंडे

अमरावती : पाच दशकानंतर कापसाला या वर्षी सोनेरी दिवस आले आहेत. कापसाच्या भावाने यंदा प्रथमच दहा हजाराचा आकडा पार केला आहे. हा दर टिकवण्यासाठी हमीदरात वाढ करणे व सबसिडीचे संरक्षण देणे गरजेचे आहे. सोबतच उत्पादन वाढावे यासाठी नवीन संशोधित वाणांची आवश्यकता आहे. मात्र स्वतःच द्विधा मनस्थितीत असलेले केंद्र व राज्य सरकार हे धोरण अंमलात आणेल का हा मूळ प्रश्न आहे.

यंदा जागतिक पातळीवरच कापसाचे उत्पादन घसरले आहे. कापूस उत्पादन घटण्याचा गंभीर परिणाम कापसाच्या बाजारात प्रभावीपणे दिसू लागला आहे. भारतात ३६० लाख गाठींचे उत्पादन सामान्यतः होते. मात्र, यंदा ते ३१० लाख गाठींपर्यंत खाली येण्याचे, म्हणजेच तब्बल ५० लाख गाठींनी उत्पादन कमी होण्याचे चिन्ह आहे. भारतासह ब्राझील, चीन, अमेरिका या देशांतही कापसाचे उत्पादन घटले आहे. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातही ते कमी झाले आहे.यावर्षी कापसाला मिळालेला भाव पुढेही टिकवायचा असेल तर घटलेली उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. अमेरिकेत कापसाच्या रूईची उत्पादकता प्रती हेक्टरी २ टन आहे. विदर्भात मात्र ती केवळ एकरी ३ ते ४ क्विंटल इतकीच आहे.

गुजरातमध्ये हीच उत्पादकता एकरी ८ तर महाराष्ट्रात ४ क्विंटल आहे. कापसाची उत्पादकता वाढवायची असेल तर संशोधित वाणांची गरज आहे. पंधरा वर्षांपूर्वी बीजी २ वाणाला सरकारने परवानगी दिली. त्यानंतर नवीन वाणाला परवानगी मिळालेली नाही. जेनेटिक मॉडीफाईड कॉटनच्या सीडवर असलेली बंदी हटवावी व चांगल्या गुणवत्तेचे बियाणे उपलब्ध करून दिल्यास उत्पादकता वाढू शकते.

द्विधा मनस्थितीत सरकार

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करावी, असा प्रचार केंद्र सरकारकडून केल्या जात असतानाच अधिक उत्पादनासाठी आधुनिक शेतीचाही प्रचार केल्या जातो. त्यामुळे नैसर्गिक अथवा सेंद्रीय शेती करावी की उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते वापरून व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आधूनिक शेत करावी. असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. केंद्र व राज्य दोन्ही सरकार यामधील फरक स्पष्ट करण्याबाबत स्वतःच द्विधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येते. (क्रमश:)

यंदा १० हजारावर गेलेले भाव टिकून राहण्यासाठी हमीदरात वाढ करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सबसिडीचे संरक्षण आहे. केंद्र सरकारने हमीदर वाढवून सबसिडीचे संरक्षण दिले तरच कापसाच्या शेतकऱ्यांचे आर्थिक दुष्टचक्र सुटू शकते.

- विजय जावंधिया,शेतकरी संघटना नेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT