cotton seeds sakal
विदर्भ

चार कंपन्यांचे कपाशी बियाणे फेल

जिल्ह्यात विक्रीवर बंदी; नागपूर येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेचा अहवाल

चेतन देशमुख

यवतमाळ - पेरणीपूर्व कापूस बियाण्यांच्या तपासणीत चार नमुने निकृष्ट असल्याचा अहवाल नागपूर येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेने दिला आहे. ज्या चार कंपन्यांचे नमुने रद्द ठरले आहेत, त्या बियाणे उत्पादक कंपन्यांना कृषी विभागाने विक्रीबंदीचे आदेश दिले आहेत.

बोंडअळी रोखण्यासाठी बीटी कापूस बियाण्यांची पेरणीपूर्वीच काटेकोर तपासणी करण्याचा आदेश शासनाने आधीच दिला. त्याशिवाय १ जूनपर्यंत कापूस बियाणे शेतकऱ्‍यांना विक्रीस मनाई करण्यात आली होती. जूनपासून कापूस विक्रीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने कापूस, सोयाबीन बियाण्यांचे नमुने घेण्यात आले.

जिल्ह्यातून बियाण्यांचे ३३७ तर खतांचे ६९ नमुने घेतले. बियाण्यांचे नमुने तपासणीकरिता नागपूर येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये चार बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता या चार कंपन्यांना सध्या ‘स्टॉप सेल’चे आदेश देण्यात आले आहेत. बियाणे नमुने निकृष्ट आढळलेल्या उत्पादकांमध्ये कापसाचे बियाणे बोगस आढळले आहे. त्यात एकूण कंपन्यांच्या नमुन्यांचा समावेश आहे.

कापूस पिकावर बोंडअळीचा प्रकोप झाला. पीक नुकसानासाठी शासनाने घोषित केलेली मदत शेतकऱ्‍यांच्या पदरात पडली नाही. तेव्हापासून बोंडअळी येऊ नये, यासाठी शासन खबरदारी घेत आहे. मात्र, कंपन्यांनी शासनाच्या या प्रयत्नाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र आहे. नमुने फेल आल्याने कृषी विभागाने संबंधित बियाण्यांची विक्री करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

बियाणे घेतलेल्या शेतकऱ्यांची वाढली चिंता

सध्या विक्रीबंदीचे आदेश असले तरी काही शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीचा माल विकत घेतला असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्‍यांनी पेरणी केली असल्यास त्यांच्या जिवाला घोर लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT