cotton selling centers in yavatmal closed due to bharat band agitation 
विदर्भ

Bharat Band Updates : यवतमाळमधील कापूस खरेदी बंद, पणनसह सीसीआय़च्या केंद्रांवर शुकशुकाट

चेतन देशमुख

यवतमाळ : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज मंगळवारी (ता.आठ) भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यांच्या या मागणीला यवतमाळातील अनेक संघटनांचा पाठिंबा आहे. त्यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील कापूस खरेदी एक दिवस बंद ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यात सीसीआयच्या सात, तर पणनच्या तीन केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. कापूस पणन महासंघ व 'सीसीआय'च्या केंद्रांच्या तुलनेत खासगी बाजारातील कापूस खरेदीची उलाढाल वाढली आहे. जिल्ह्यात 'सीसीआय'ने आतापर्यंत जवळपास अडीच लाख क्विंटलच्यावर, तर पणन महासंघाची खरेदी 50 हजार क्विंटलच्यावर पोहोचली आहे. सध्या कापसाची आवक मंदावली असली तरी बऱ्यापैकी केंद्रावर कापूस येत आहे.

कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. तो प्रकट करण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक अनेक शेतकरी संघटनांनी दिली आहे. आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकरी तसेच सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. बाजार समित्यांनी पाठिंबा देत एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच बंद राहणार असल्याने सीसीआय तसेच पणनने कापूस खरेदी बंद ठेवली आहे. सीसीआयकडून राळेगाव, खैरी, वणी, शिदोंला, पांढरकवडा, घाटंजी, मुकूटबन ही सात केंद्रे सुरू आहे. पणनकडून यवतमाळ, कळंब व आर्णी ही तीन केंद्रे सुरू आहेत. भारत बंद दरम्यान ही केंद्रेही बंद आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT