avaidhya valu upasa. 
विदर्भ

ग्रामीण भागात शासनाला लाखोंचा चुना

सकाळ वृत्तसेवा

तरोडा (जि. अकोला) : अकोट तालुक्यातील दहीहांडा, काटी-पाटी, केळीवेळी, चोहोट्टा बाजार व देवरी फाटा परिसरात असलेल्या नदी-नाल्यांमधून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफीयांनी अहोरात्र सुरू केलेले अवैध वाळू उत्खनन चिंतेचा विषय बनला असून, रेती माफीयाची चांगलीच चांदी होत असल्याच्या चर्चांना परिसरात उधान होत आहे.

नदीपात्र बनले वाळवंट
सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या आंधारात होते अवैध वाळूची चोरी सध्या दहीहांडी, काटी-पाटी, केळीवेळी, चोहोट्टा बाजार येथील नाल्यामधून होत आहे. या परीसरातील नदी नाल्यामधून रोज अवैध वाळू चोरी सुरू आहे. दिवसाढवळ्या व रात्रभर अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्याचा सपाटा रेती माफीयांनी सुरू केला आहे. केळीवेळीतील पुर्णा नदी पात्रातून व मोहाळी येथील चंडीका नदीपात्रातून तर देवरी फाटा येथील खार नाल्यामधून राजरोसपणे वाळू उपसा होत आहे. वाळू माफीयांनी नदीपात्राला वाळवंट बनवून वाळूसाठे केले आहेत. विनापरवाना वाळू साठा बेकायदेशीररित्या करून ठेवणे सुरू आहे. याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याची चर्चा परिसरात आहे.

लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे
वाळू वाहतूक करताना अनेक विनानंबर प्लेटच्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. यात ट्रॅक्टर, टिप्पर यासह अन्य वाहनांचा समावेश होत आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे चांगभल होत आहे. वाळू तस्कर रात्रीचा दिवस करून रेतीउपसा करीत आहेत. मुख्य मार्गावरून रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. मात्र, काही अपवाद वगळता ठोस कारवाई होताना दिसत नाही. अनेकवेळा प्रकरण दाबल्याचेही प्रकार अधून-मधून घडत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. कारवाई बघून मार्ग बदलून रेतीची वाहने वेळीच जागा सांगून वळविली जातात. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, अवैध गौणखनिज प्रकरणी ठोस कारवाई होणे गरजेचे आहे.

कारवाई करणार
अवैध गौणखनिज संदर्भात तहसीलदारांनी पथक नेमलेले असून, तपासणी सुरू आहे. वाळू अवैध वाहतूक आढल्यास कारवाई करू.
-अनिल ओंईबे, मंडळ अधिकारी, चोहोट्टा बाजार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP : सुनेत्रा पवारांची खेळी यशस्वी, पुणे झेडपीत विषय समित्यांचे सभापती जाहीर; सव्वा वर्षांचा कार्यकाळ, हर्षवर्धन पाटलांच्या कन्येला संधी

US Education Trends : भारतीय विद्यार्थ्यांना नकोय अमेरिकेत शिक्षण ! प्रवेशांच्या संख्येत घट; धक्कादायक कारण आले समोर, सरकारचा संसदेत खुलासा

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस माफियांवर मोठी कारवाई, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

SCROLL FOR NEXT