नागपूर : झाड तोडण्यावरून झालेल्या वादात इसमाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या वडिलांसह दोघा मुलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मारुती किसन बिटे (वडील) आणि देवेंद्र मारुती बिटे, देवानंद मारुती बिटे (मुले) असे आरोपींचे नावे आहेत. ही घटना १६ मार्च २०१६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील विहीरगाव (ता. राळेगाव) येथे घडली होती.
न्या. झेड. ए. हक आणि न्या. अमित बोरकर यांनी हा निकाल दिला. घटना अशी की, मारुती बिटे हा प्रवीण गाडगे याच्या शेताला लागून असलेली बाभळीची झाडे तोडत होता. त्यावरून वाद झाला. या वादात मारुती व त्याचा मुलगा देवानंद यांनी प्रवीणला पकडून ठेवले व दुसरा मुलगा देवेंद्रने त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे प्रवीण हल्ल्यात जागीच ठार झाला. सत्र न्यायालयाने मारुती व देवानंदला निर्दोष सोडून देवेंद्रला ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे तपासून तीनही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला. ही रक्कम मृताच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. राज्य सरकारतर्फे अॅड. तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.