Amravati Crime  sakal
विदर्भ

Amravati Crime : हत्येचा गुन्हा बाभूळगाव पोलिसांना हस्तांतरित;पत्नीसह मित्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी

यवतमाळ जिल्ह्यातील पहुर येथील पतीच्या हत्येप्रकरणी आधी दत्तापूर पोलिसांनी दाखल केलेला हत्येचा गुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यात मृत व्यक्तीची अटक पत्नी व तिचा मित्र अशा दोघांना धामणगावरेल्वे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील पहुर येथील पतीच्या हत्येप्रकरणी आधी दत्तापूर पोलिसांनी दाखल केलेला हत्येचा गुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यात मृत व्यक्तीची अटक पत्नी व तिचा मित्र अशा दोघांना धामणगावरेल्वे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोघा संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली. गंगा गजानन राठोड (वय ३५, रा. पहुर, जि. यवतमाळ) व सचिन श्रावण राठोड (वय ३०, रा. वीरगव्हाण) अशी हत्येच्या गुन्ह्यातील अटक संशयितांची नावे आहेत.

त्या दोघांवर गजानन नथ्थूजी राठोड (वय ४०, रा. पहुर) यांची संगनमताने हत्या केल्याचा आरोप आहे. गुरुवारी (ता. २०) रात्री ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पहूर गावात घडली होती. घरातच गजानन याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून गजानन राठोड याचा मृतदेह संशयित सचिन राठोड याने सदर गाठोडे धावमणगावरेल्वे रेल्वेलाईनवर आणून फेकले होते. शुक्रवारी (ता. २१) ही घटना उघडकीस आल्यानंतर दत्तापूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

त्या दोघांना अटक करून शनिवारी (ता. २२) सायंकाळी धामणगावरेल्वे येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले होते. घटनास्थळ हे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सदर गुन्हा दत्तापूर पोलिसांनी पुढील तपासकरिता यवतमाळ पोलिसांकडे वर्ग केला. अशी माहिती दत्तापुरचे ठाणेदार नितीन देशमुख यांनी दिली. सोमवारी (ता. २४) यवतमाळ पोलिस अमरावती कारागृहातून दोघाही संशयितांना ताब्यात घेतील, असे ही ठाणेदार देशमुख यांनी सांगितले.

हत्येचा प्रकार उघडकीस आल्याने तातडीने दत्तापूर पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली. परंतु घटनेला पहुर येथून सुरवात झाल्याने गुन्हा यवतमाळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

-नितीन देशमुख, ठाणेदार, दत्तापूर पोलिस ठाणे, जि. अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT