murder 
विदर्भ

चुलत भावांचा वाद गेला विकोपाला, नंतर घडले असे...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पुसदा गावात अंत्यविधी आटोपल्यावर त्यांनी जेवण केले. त्यानंतर दारूच्या नशेत असताना चुलत भावांमध्ये वाद होऊन त्यात एकाचा खून झाला. गुरुवारी (ता. नऊ) रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

अनिल रामदास इंगोले (वय 28 रा. लालगंज, नागपूर) असे मृत युवकाचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी (ता. नऊ) नागपूर येथून अनिल इंगोले, तुळीदास विष्णूजी इंगोले, व गजानन विष्णूजी इंगोले हे तिघेही पुसदा गावात सुनील इंगोले यांच्या घरी आले होते. रात्री जेवण केल्यानंतर तिघांनी मद्यप्राशन केले.
 

हेही वाचा - 'हास्य क्‍लब'मध्ये हास्याचे कारंजे

घरासमोर बसले असताना त्यांच्यात वाद झाला. त्यांनतर क्रिकेट खेळण्याच्या बॅटने गजानन व तुळशीदास या दोघांनी अनिल यास जबर मारहाण केली. बॅटने अनिलच्या डोक्‍यावर प्रहार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पहाटे अनिल इंगोले याचा मृत्यू झाल्याचे पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.

मृत अनिल व त्याचा खून करणारे हे चुलत भाऊ आहेत. हातून खून झाल्याचे लक्षात येताच, तुळशीदास व गजानन इंगोले हे दोघे भाऊ पुसदा गावातून पसार झाले. सुनील इंगोले यांच्या तक्रारीहून, वलगाव पोलिसांनी पसार गजानन व तुळशीदास या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. वलगाव पोलिसांचे एक पथक पसार दोघांच्या अटकेसाठी नागपूरला रवाना झाले.

नशेत असताना क्षुल्लक कारणामुळे वाद होऊन अनिल इंगोलेच्या हत्येची घटना घडली, असे प्रथमदर्शनी दिसून येते. मारेकऱ्यांच्या अटकेनंतर खरे कारण पुढे येईल.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, वलगाव ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार एवढे रुपये; पाहा ताजा भाव

ODI World Cup 2027 पूर्वी टीम इंडिया २५ वन डे सामने खेळणार! जाणून घ्या कोणाकोणाला भिडणार... वेळापत्रक एका क्लिकवर

Gokul Election Mahayuti Seat : राष्ट्रवादीला नऊ, तर भाजप, सेनेला प्रत्येकी सात जागा; 'गोकुळ'साठी महायुतीचे जागांचे सूत्र ठरले, मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयाकडे नजरा

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या विरोधात 'आप' कडून जंतर-मंतर परिसरात आंदोलन

ODI World Cup 2027 ची तयारी जोरात! भारतीय संघ स्पर्धेपूर्वी तगड्या संघाविरुद्ध खेळणार ६ वन डे; RO-KO ला कोण रोखणार?

SCROLL FOR NEXT