The cowherd built a dam on the nala 
विदर्भ

गुराख्याने लढवली शक्कल अन् नाल्याचा झाला बंधारा; जनावरांना झाली पिण्याच्या पाण्याची सोय

राधेश्‍याम कवरे

डव्वा (जि. गोंदिया) : जांभळी येथील मंगरू मन्साराम गावड या गुराख्याने जंगलात जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा, म्हणून बंधारा बांधून गावकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. त्याच्या या कामाचे किंबहुना मेहनतीचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

मंगरू गावड हे जांभळी गावातील जनावरांना जंगलात चराईसाठी नेत असतात. परंतु, जनावरांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यासाठी काहीतरी करावे लागेल, असे त्यांच्या मनात घोळू लागले. जंगलातील नाल्याला मातीने अडवून बंधारा बांधला पाहिजे, असा विचार मनात येताच त्यांनी जंगलातील नाल्यावर दहा दिवस कष्ट उपसून बंधारा बांधला.

सोबतच नाल्याच्या आजूबाजूला जनावरे चराईसाठी पाण्याची सोय होईल म्हणून अवघ्या दहा दिवसांत पाच फूट उंच, दहा मीटर लांब, एक मीटर रुंद अशी पाणी अडवण्यासाठी मातीची पार बांधली. त्यामुळे आजमितीस अंदाजे तीन फूट खोल व २० मीटर लांब पाण्याची सोय झाली आहे. आता या पाण्याचा उपयोग गावातील पाळीव प्राण्यांना होतो. शिवाय जंगलातील वन्यप्राण्यांनासुद्धा या पाण्याचा उपयोग होत आहे.

श्रमदान करण्याची शिकवण जनावरे राखणाऱ्याने दिल्याने गावकऱ्यांना घटनास्थळाला भेट देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. घटनास्थळी जांभळीचे क्षेत्र सहायक वाय. टी. ठवकर, वनरक्षक व्ही. आर. आडे, के. झेड. बिजेवार, एस. यू. चव्हाण, सरपंच विजय सोनवाणे, पोलिस पाटील नेहरू उईके यांनीदेखील भेट दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT