crime.jpg
crime.jpg 
विदर्भ

बापरे! घरात घुसून गळ्याला लावला कोयता अन्...

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : मध्यरात्री घरात घुसून गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने  जबरीने काढून घेतले. सदर घटना तालुक्यातील भीवगाव येथे बुधवारी घडली असून पोलिसांनी तपासाअंती  (ता.12) दोघा महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील भिवगाव येथे एका घरात घुसून फिर्यादी महिलेच्या गळ्यावर कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादी व तिच्या सोन्याच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले व त्यांना घरात कोंडून ठेवले तसेच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी रात्री दरम्यान घडला. 

याबाबत पोलिसात दाखल तक्रारी नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी भीमानंद नलावडे, पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, सहाय्यक निरीक्षक पी.डी भातानाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चौकशीअंती सदर प्रकरणात सरस्वती शहादेव खुळे (वय 45) राहणार भिवगाव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सर्जेराव गाडेकर, भीमराव सोनाजी गायकवाड, संतोष जाधव, लक्ष्मी भीमराव गायकवाड व शारदा सजेराव गाडेकर सर्व राहणार भिवगाव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. याबाबत बीट जमादार श्री जायभाय तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसच्या उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT