aaa.jpeg 
विदर्भ

समृद्धीचे स्वप्न पाहणाऱ्या पिढीची निर्माती अत्यावश्यक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : परीश्रमाचा पुरस्कार करीत समृद्धीचे स्वप्न पाहणारी पिढी निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन, आंतरराष्ट्रीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे यांनी केले.


डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग अकोला यांच्या संयुक्तपणे ‘सिंचन व पाण्याचा कार्यक्षम वापर’ या विषयावर आयोजित, दोन दिवसीय 20 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचा रविवारी (ता.19) समारोप झाला. या प्रसंगी अकोला कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांचे विशेष उपस्थितीत संपन्न झालेल्या समारोपीय सत्रावेळी महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि.मा. मोरे, उपाध्यक्ष डॉ.बापू अडकिने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ.महेंद्र नागदेवे, सिंचन सहयोग अकोलाचे अध्यक्ष डॉ.सुधीर वडतकर प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी विद्यापीठाचे सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ हे शेती आणि शेतकरी विकासासाठी तत्पर असून, सिंचन परिषदेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी आश्वस्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दि. मा. मोरे व डॉ. सुधीर वडतकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत आडे यांनी केले तर, डॉ. एम. एम. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दुसऱ्या दिवशी सहा सत्रांमधून विचारांची मांडणी
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.19) सकाळी 9 ते 10.30 या वेळेत सहावे सत्र ‘पाण्याची उपलब्धता व सिंचन विस्तार, पाण्याचा ऱ्हास’ या विषयावर डॉ. शंकरराव मगर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. या विषयावर डॉ. राजेश पातोडे, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. गजानन सातपुते, डॉ. अशोक म्हस्के, चिन्मय वाकोडे, अनिकेत सहभागी झाले होते. सातवे सत्र सकाळी 10.45 ते 11.45 या वेळेत ‘आदर्श सिंचन व्यवस्थापनासाठी पाणी वापर संस्थांचा सहभाग व सक्षमीकरण’ या विषयावर अविनाश सुर्वे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाले. या परिसंवादात दादाराव देशमुख, राजेंद्र इंगळे, मनोज तायडे, अविनाश डुडूळ यांनी विचार मांडले तर, ‘थेट विक्री व्यवस्था’ या विषयावर आठव्या सत्रात 11.45 ते 12.45 या वेळेत प्रा. अ. गो. पुजारी यांचे अध्यक्षतेत अरुणा शेळके, वंदना दाभाडे, अनिल कवळे, शैलेंद्र गाताडे, संतोषी मारणे, अशोक शेवते, रामकिशन गुंड यांनी मनोगत व्यक्त केली. दुपारी 12.45 ते 1.45 या वेळेत पार पडलेल्या नवव्या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी भूषविले तर, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. ज्ञानेश्वर बोडके यांनी विचार मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT