credit war in Amravati over allotment of houses in schemes  
विदर्भ

अमरावती जिल्ह्यात लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्यावरून जुंपली; आमदार आणि सभापतींमध्ये श्रेयवादाची लढाई 

प्रदीप बहुरुपी

वरुड (जि. अमरावती)  ः केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. त्याबरोबरच घरकुलाच्या श्रेयवादाची लढाईही सुरू झाली. येत्या काळात हा श्रेयवादाची लढाई अधिक रंगतदार होणार असली तरी घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार काय असा सवाल करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील तीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असतानाच त्यापैकी तालुक्‍यातील केवळ 3 हजार 69 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. हे घरकुल आपल्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांचे म्हणणे आहे. तर घरकुल मीच मंजुर केल्याचा दावा करणाऱ्या देवेंद्र भुयार यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकातुन म्हटले आहे.

आमदार भुयार यांनी ग्रामपंचायत ब यादीतील लाभार्थ्यांची नावे मागवून स्वतःच्या लेटरपॅडवर मी घरकुल मंजूर केल्याचे सांगणारा मजकूर लिहून ते पत्र लाभार्थ्यांना पाठविले. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. अंमलबजावणी करिता ग्रामपंचायत, पंचायत समिती ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचाच सहभाग असतो. त्यामुळे सरपंच, पं.स.सभापती, जि.प.अध्यक्ष व प्रशासन यांनाच या घरकुल बाबतीत पाठपुरावा करावा लागतो.

2020-21 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घरकुल लक्षांक मंजूर झालेले आहे. त्याचप्रमाणे वरुड तालुक्‍याला एकूण 3069 लाभार्थ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी 30 हजार 998 घरकुलाचा लक्षांक मंजूर आहे. घरकुल योजना ही दरवर्षाला सातत्यपूर्ण लक्षांक घेऊन पुढे चालत असते. या योजनेत आमदारांचा संबंध येत नसतानाही हे घरकुल त्यांनी मंजूर केल्याचा दावा न करता मतदारसंघात बरेच जनहिताची कामे असून ती कामे कशी पूर्ण करता येईल व नागरिकांना कसा न्याय देता येईल, याकडे लक्ष दिल्यास जास्त बरे होईल. असे विक्रम ठाकरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT