crime (2).jpg 
विदर्भ

नमाज अदा करण्यासाठी गेले अन् झाला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि.बुलडाणा) : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोविड 19 हा संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 नुसार आजाराच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता शासनाने बुलडाणा जिल्हा देखील लॉकडाऊन केलेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कलम 144 फौजदारी नुसार संचारबंदीचे आदेश लागू आहे.

चिखलीमध्ये सुद्धा धार्मिक स्थळावर सामूहिक प्रार्थना, पूजा, नमाज पठण इत्यादी कार्यक्रमाकरिता पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी एकत्र झालेल्या मुस्लिम बांधवावर चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तबलीक जमातीचा मरकज प्रकरण सध्या पूर्ण देशात गाजत असतानाच चिखली शहरामध्ये सुद्धा शुक्रवार (ता.3) जुम्मा नमाज अदा करण्याकरिता चिखली स्थित बारभाई मोहल्ला मधील जामा मस्जिद येथे पंधरा ते वीस लोकांनी मस्जिदच्या गेटवर जमा होऊन नमाज पठणाकरिता मस्जिद मध्ये जाण्यासाठी गर्दी केली होती. 

परंतु, सदर बाबीची गुप्त माहिती पेट्रोलिंग दरम्यान चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांना मिळाल्यावरून सदर ठिकाणी जाऊन मलिक खान अताउल्लाह खान (वय 36), शेख नाजीम ठेकेदार (वय 32), शेख अतहर मास्टर (वय 27), हाजी रमजानी मिस्त्री (वय 55), मुजीब महम्मद रूफिक जक्कीवाला (वय 35), अयाज ठेकेदार रेतिवाले (वय 55), राजिक खान शफीक खान (वय 32), शेख अमन शेख वजीर (वय 62), शेख अफरोज शेख रमजानी (वय 30), शेख गुड्डू शेख रमजानी (वय 24), जुनैद खान अताउल्लाह खान (वय 35), हाजी अताउल्लाह खान (वय 65) सर्व रा. बारभाई मोहल्ला चिखली यांचेवर संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यावरून पो.हे.कॉ. विक्रम काकड यांचे लेखी फिर्यादी वरून पोलिस स्टेशन चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

क्षुल्लक कारणावरून वाद, लाथाबुक्यांनी मारहाण करत बंदुकीचा धाक; शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी; ठाण्यात काय घडलं?

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Pune PMPML Security: सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च, तरी आगारांत सुरक्षारक्षकच नाहीत; पीएमपीएमएलचा धक्कादायक कारभार उघड

SCROLL FOR NEXT