Crime esakal
विदर्भ

Crime News: आधी १० हजारांची वस्तू दिली पाच हजारात, मग स्मार्ट डीलच्या नावाने घातला कोट्यवधींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

वर्धा, : शहरात स्मार्ट डील नावाची कंपनी उभारत ५० टक्के सवलतीचे ग्राहकांना आमिष देत जिल्ह्यात जवळपास पाच कोटी रुपयाने ग्राहकांची फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार करण्यात आली असून प्रकरण चौकशीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत भाऊसाहेब निन्नावणे, ममता प्रशांत निन्नावणे दोन्ही रा. नागपूर यांनी स्मार्ट डील नावाने शहरात कंपनी स्थापन केली. ब्रॅंडेड वस्तू अर्ध्या किंमतीत देत बाजारात नागरिकांचा विश्वास संपादन केला. ग्राहक वाढविण्यासाठी जिल्ह्यात तालुक्याच्या, गावाच्या ठिकाणी प्रतिनिधी नेमले. यांच्या माध्यमातून ग्राहकांना जोडले.

२१ दिवसात ग्राहकांना प्रोडक्ट मिळेल अशी बतावणी करून ग्राहकांकडून करोडो रुपये वसूल करण्यात आले. मोठी रक्कम गोळा होताच दोन्ही व्यक्तींनी कंपनी बंद करून पोबारा केला. ग्राहकांकडून घेतलेल्या पैशाची वस्तू मिळाली नसल्याने ग्राहकांनी कंपनीने नेमलेल्या एजंटला पैशाची मागणीसाठी त्रास सुरू झाल्याने प्रकरण पोलिसात पोहोचले. या प्रकरणी शहर पोलिसात, पोलिस अधीक्षकांना निवेदनातून तक्रार करण्यात आली आहे.

जिल्ह्याभरात जाळे

शहरातील बॅचलर मार्गावरील शर्मा याच्या घरी भाड्याचे ऑफीस घेवुन स्मार्ट डील नावाने २६ जानेवारी २०२३ ला कंपनीची सुरूवात केली. किराणा, फर्निचर, ईलेक्ट्रीक उपकरणे, फ्लॅट, कार, दुचाकी वाहणे, व इतर सेवा ग्राहकांना अर्ध्या किमतीत पुरविणे हे कंपनीचे उद्धीष्ट होते. यासाठी जिल्ह्यात १० ते १२ सेल्समनची कामासाठी नियुक्ती करण्यात आली. याच्या माध्यमातून अवघ्या चार महिण्यात करोडो रुपयांची माया जमवून ग्राहकांची फसवणुक केली.

१० हजारांची वस्तू ५ हजाराला

कंपनीच्या उद्धीष्ठानुसार सुरूवातीला सेल्समनने जोडलेल्या ग्राहकांना १० हजारांची वस्तू पाच हजारांना देण्यात आली. यात किराणा साहित्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होता. त्यामुळे अल्पावधितच जिल्ह्यात ग्राहकांची संख्या वाढली. ग्रामीण भागात तर किराणा व्यावसायिक याच कंपनीकडून किराणा विकत घेत असल्याची माहिती आहे. जवळपास १२५ ग्राहकांना लाभ देण्यात आल्याने अनेकांनी यावर विश्वास ठेऊन लाखो रुपये गुंतवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT