विदर्भ

शिवसेना पदाधिकाऱ्याची हिंमत वाढली; पोलिसांकडून मशीन हिसकली

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : येथील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने रस्त्यावर तैनात वाहतूक पोलिसांसोबत वाद घालून, स्वाईप मशीन हिसकावून घेतली. शहरातील वर्दळीच्या पंचवटी चौक ते मोर्शी मार्गावर ही घटना घडली. नंदू त्र्यंबकराव काळे (वय ४०, रा. लक्ष्मीनगर) असे पदाधिकाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काळे या व्यक्तीने स्वत:ची एमएच २७ बीएक्स २६२६ क्रमांकाची कार रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पार्क केली होती. चौकात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शिवनाथ हरिश्चंद्र कातकडे (ब. नं. १४४६) हे तैनात होते. पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे सदर कार योग्यठिकाणी पार्क करावी, तेथून हटवावी अशी विनंती नंदू काळे यांना केली. त्यांनी राजकीय पद्धतीने रुबाब दाखविण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ केली, असा आरोप आहे.

ड्यूटीवर तैनात वाहतूक पोलिस शिपायाने दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्वाईप मशीन काढली असता नंदू काळे यांनी कातकडे या पोलिस कर्मचाऱ्याच्या हातातील स्वाईप मशीन हिसकावून घेतली. याप्रकरणाची तक्रार वाहतूक शिपायाने गाडगेनगर ठाण्यात नोंदवली असता पोलिसांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीसह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ड्यूटीवर तैनात पोलिस कर्मचाऱ्याने नियमानुसार कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी रस्त्यावरच पोलिसासोबत गैरवर्तन केल्यामुळे नियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 TRADE: नवा कोच, नवा प्लान! हार्दिक पांड्याच्या ट्रेडवरून CSK चं विधान; ऋतुराज, MS Dhoni यांच्याशी चर्चा, नेमकं काय शिजतंय?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात भडका! 7 दिवसांत 11 हजारांनी महाग; आज तर तब्बल... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती?

Marathi News Live Updates: कंगना रणौत यांचा राहुल गांधींवर आरोप; संसद चालू न देण्याचा विरोधकांवर ठपका

“त्यांनी मला जोरात मारलं अन् मी रडू लागले”; नाना पाटेकरांनी अभिनेत्रीला मारलेली कानशि‍लात

Abhijit Dipke Protest: दीपकेंविरोधात उपोषण करणाऱ्या दोघांचीही प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल करताच...

SCROLL FOR NEXT