Crime esakal
विदर्भ

Crime News : ६० लाखांची फसवणूक; बंटी-बबलीसह चौघांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत किराणा व्यापारात गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीसह चौघांविरुद्ध ६० लाखाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अजय रामदास गायकवाड (वय ४६), सीमा अजय गायकवाड (वय ४०), मोहन ऊर्फ मोंटी वासुदेवराव विकोडावार (रा.वृंदावननगर), किर्ती अशोक शिरपूरकर (वय ४० रा.रुख्मिणीनगर) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव प्रल्हादराव लुटे (वय ४५ रा.कन्हय्या आर्केट, व्यंकटेश सिटी,बेसा) यांची नोव्हेंबर २०२० मध्ये गायकवाड दाम्पत्याची साहेबराव यांच्यासोबत ओळख झाली. त्यांनी लुटे यांना वर्मा ट्रेडिंग कंपनीचे दलाल असल्याचे सांगून किराण्याचा व्यापार करीत असल्याची माहिती साहेबराव यांना दिली.

याशिवाय मोहन हा व्यवस्थापक व किर्ती ही मुख्य मालक असल्याचे सांगितले. पहिल्या दिवशी कमी भावात माल बुक करून दुसऱ्या दिवशी चढ्या दऱ्याने विक्री केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष चौघांनी साहेबराव यांना दाखविले. त्यातून लुटे यांनी १४ लाख रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले.

दुसऱ्या दिवशी आरोपींनी त्यांना ३५ हजार रुपयांचा नफा मिळवून दिला. त्यानंतर साहेबराव यांनी किर्तीच्या खात्यात पाच लाख ५० हजार रुपये जमा केले. तसेच पूजा रमेश सहस्त्रबुद्धे यांनी १८ लाख २७ हजार, वैशाली राजेश गिरी यांनी २२ लाख ७ हजार रुपये जमा केले.

सर्वांनी आरोपींच्या विविध बँक खात्यात एकूण ६० लाख ४७ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. पैसे जमा होताच सर्व जण पसार झाले. फसवणूक झाल्याने साहेबराव यांनी हुडकेश्वर पेालिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT