crime news rapes minor girl young man showing the lure of marriage sakal
विदर्भ

विवाहित तरुणाकडून लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आरोपीस अटक,गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

तिवसा -येथील एका विवाहित तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपीस अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.अमोल मुकुंद कडू(वय 35 वर्ष ,रा.कमल कॉलनी तिवसा) असे आरोपीचे नाव आहे.आरोपी हा विवाहित असून गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते.

तो मिनी आटो चालविण्याचे काम करीत असून तो मजूर महिलांना त्याच्या छोट्या वाहनात नेण्याचे काम करीत असतानाच त्याची ओळख एका अल्पवयीन मुलीशी झाली.यातच त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले असता आरोपी विवाहित तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार प्रेमसंबंध प्रस्थापित केले, तिने याबाबतची तक्रार तिवसा पोलिसांत दाखल करताच पोलिसांनी आरोपी अमोल कडू यांचे विरुद्ध कलम 376,तसेच पोस्को 4,6 अन्वये गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.याप्रकरणी पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT