Crime 
विदर्भ

Crime news : चोरांची शक्कल! गॅसकटरने एटीएम मशिन कापून लाखोंची लूट; सराईत टोळीचा कारनामा

सकाळ वृत्तसेवा

वरुड (अमरावती) : वरुड तालुक्यातील जरुड येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने कापूर १६ लाख ४५ हजारांची रोकड लुटारुंनी लंपास केली. संपूर्ण घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस तपास सुरू आहे. ज्या पद्धतीची घटना घडली त्यावरून सराईतांच्या टोळीचा हा कारनामा असल्याचे स्पष्ट होत आहे.

जरुड येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा व एटीएम सुद्धा आहे. गुरुवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघेजण एटीएम फोडत असून बाहेर ०४२३-२५२० या क्रमांकाची लाल रंगाची कार उभी असल्याचे दिसून येत आहे. रक्कम हस्तगत केल्यावर त्याच कारने दोघेही पसार झाले. व्यवस्थापक पवन भोकरे यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सायरन वाजल्याने यंत्रणेच्या हालचाली

एटीएमच्या देखभालीचे काम मुंबई येथील कंपनीकडून केल्या जाते. त्यात सायरन सिस्टीम बसविण्यात आली आहे. गैरप्रकार झाल्यास मुंबई येथील मुख्यालयात त्याची सूचना मिळते. गुरुवारी सायरन वाजताच संबंधित कंपनीने तातडीने बँकेचे शिपाई किशोर बेलसरे यांना कळविले. शिपायाने जागा मालक विलास दिवराळे यांना माहिती दिली. त्यांनी एटीएमकडे धाव घेतली. तोपर्यंत लुटारू पसार झाले होते. असे पवन भोकरे यांनी सांगितले. (Breaking Marathi News)

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रेचा वापर

दोघे जण एटीएम सेंटरच्या आत शिरल्यानंतर त्यांनी गॅसकटरनचा वापर करण्यापूर्वी आतील दोन्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारुन कॅमेरा नादुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही चोरीचे चित्रीकरण झाले.

पाच पोलिस पथकांचे गठण

या खळबळजनक घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हेशाखा व वरुड ठाणे यांचे प्रत्येकी दोन तर, सायबर ठाण्याचे एक अशी पाच पथके गठित करून तपास सुरू करण्यात आला. रेकॉर्डवरील अनेकांची तपासणी केली. राज्यातील सर्वच पोलिस ठाण्याला जरुडच्या घटनेची माहिती देण्यात आली. असे स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: पाणी उशिरा आणलं म्हणून शिक्षकांकडून मारहाण; घाबरलेली लेकरं जंगलात पळाली अन्..., पालघर ZP शाळेतील घटना

Bihar : कॉर्पोरेटमधली नोकरी सोडून नेत्याचा मुलगा राजकारणात उतरला, निवडणूक न लढता थेट मंत्रि‍पदी वर्णी; आई आमदार, मुलगा मंत्री

Asia Cup Rising Stars: भारत अन् पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये! कसे आहे वेळापत्रक, कुठे पाहाणार सामने?

Gadhinglaj News: गडहिंग्लज पालिका ; सत्तेच्या सोपानासाठी मोहऱ्यांची मोलाची भूमिका, निवडणूक रिंगणात बहुतांशी नवे चेहरे

Thane News : कोपरी 'बीएसयूपी'तील ८११ कुटुंबांना दिलासा! सदनिकांची दीड लाखांची नोंदणी रक्कम १०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT