Crime News Esakal
विदर्भ

Crime News : लाखांदूरच्या युवकाला पुण्यात गांजा विकताना अटक! 11 लाखांचा माल जप्त

सकाळ डिजिटल टीम

लाखांदूर(जि.भंडारा : गडचिरोली जिल्ह्यातील दोन युवकांसह लाखांदूर तालुक्यातील युवकाला पुण्यात गांजा विक्री करताना अटक करण्यात आली आहे. गांजा विक्री करण्याकरिता आलेल्या तीन उच्चशिक्षित तरुणांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरेाधी पथक-2 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 70 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

राम राजेश बैस (वय 20, रा. रामपुरी वाॅर्ड, कॅम्प परिसर, गडचिरोली), ऋतिक कैलास टेंभूर्णे (वय 21, रा. गवराळा, ता. लाखांदूर) आणि निकेश पितांबर अनोले (वय 22, रा. कस्तुरबा वाॅर्ड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (ता. 18 जून) अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

त्यावेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड आणि पोलिस हवालदार रविंद्र रोकडे यांना खराडी बायपास येथील सार्वजनिक फुटपाथवर तिघेजण गांजाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडील 11 लाख 14 हजार रूपये किंमतीचा 55 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच 50 हजाराचे 3 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्याविरूद्ध चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; भारतात नोंदवलेला पहिलाच प्रकार, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT