girls killed  sakal
विदर्भ

Nagpur : हरविलेल्या राधिकेचा मृतदेहच सापडला; दगडाने ठेचून खून झाल्याचा संशय

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विलास इंगळे हे लग्नाकरिता चिखलीला आले होते.

सकाळ वृत्तसेवा

चिखली - लग्न समारंभाकरिता परिवारासोबत आलेली एक सहा वर्षीय बालिका ता. १२ रोजी तपोवन देवी परिसरातून हरविली होती. याबाबत अंढेरा पोलिसांत कुटुंबीयांनी तक्रार दिल्यावर सर्वत्र शोधाशोध सुरूवात झाली.

पोलिसांनी नोंद घेत मुलगी हरविल्याबाबत सोशल मिडीयावर फोटोसह माहिती व्हायरल केली. मात्र हरविलेल्या निरागस राधिका विलास इंगळे हिचा मृतदेहच आज ता. १३ रोजी दुपारी मंदिराच्या मागील परिसरात आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली. दगडाने ठेचून खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विलास इंगळे हे लग्नाकरिता चिखलीला आले होते. तालुक्यातील तपोवन देवी संस्थान, रोहडा येथे काल ता. १२ रोजी लग्न असल्यामुळे ते तपोवनला कुटुंबासह उपस्थित होते.

दरम्यान खेळताना त्यांची मुलगी राधिका(वय ६) गायब झाली. सर्वत्र शोधाशोध झाल्यानंतरही ते मिळत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दिली. अंढेरा पोलिस ठाणेदार गणेश हिवरकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी राधिकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. समाज माध्यमावर फोटोसह माहिती व्हायरल केली.

मात्र आज १३ मे रोजी तपोवन देवीच्या मंदिराच्या मागील परिसरात ५०० मीटरच्या अंतरावरील डोंगराळ भागात राधिकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर बालिकेचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचण्यात आला असून अंगावरचे सर्व कपडे व्यवस्थित असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT