crime police recruitment police constable candidate attached fake certificate yavatmal
crime police recruitment police constable candidate attached fake certificate yavatmal Sakal
विदर्भ

Police Recruitment : बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे बीड ‘कनेक्शन’

सूरज पाटील

यवतमाळ : जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाईपदासाठीच्या पदभरतीत एका उमेदवाराने तोतयेगिरी करीत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडले. मैदानीसह लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर नियुक्तीपत्रापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट निघाले.

बनावट प्रमाणपत्राचे ‘बीड कनेक्शन’ असून, आणखी किती जणांनी तोतयेगिरी केली, हे तपासणे आवश्यक आहे. किशोर किसन तोरकड (वय २४, रा. बोरीवन, ता. उमरखेड), असे शासनाची फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जानेवारी महिन्यात जिल्हा पोलिस दलात चालक शिपाई व पोलिस शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

पोलिस शिपाईपदासाठी प्रकल्पग्रस्त म्हणून समांतर आरक्षणाच्या दहा जागा राखीव होत्या. त्यात सदर उमेदवाराने अर्ज केला होता. मैदानी चाचणीनंतर एकास दहा या पद्धतीने उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. मैदानी व लेखी परीक्षेत १०२ गुण मिळाले. त्यावरून पोलिस शिपाई प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षण अंतिम निवड यादीत त्याची निवड झाली होती.

प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र ग्राह्य आहे किंवा नाही, याच्या पडताळणीसाठी पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पांढरकवडाचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक जाधव यांना लेखी आदेश देत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. सपोनि जाधव यांनी प्रत्यक्ष बीड येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयात जाऊन माहिती घेतली. त्यात निवड झालेल्या एका उमेदवाराचे प्रमाणपत्र सत्य निघाले. तर, किशोर तोरकड याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे बिंग फुटले. त्यामुळे किशोर किसन तोरकड याच्यांविरुद्घ दराटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रॅकेट सक्रीय असल्याचा संशय

बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीड येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील एखाद्या लिपिकाला हाताशी धरून बनविल्याचा संशय आहे. या सखोल चौकशी झाल्यास रॅकेटच समोर येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT