Crime News esakal
विदर्भ

Crime : जुन्या वादातून कुख्यात गुंडाचा खून! अकोला रेल्वे स्थानकावरील घटना; चौघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

अकोला : लहान भावाला मारहाण केली म्हणून मनात राग धरून एका कुख्यात गुंडाला अकोट फैल परिसरातील चौघांनी रेल्वे स्थानक परिसरात चाकूने वार करीत ठार केले. ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर १ ते १.१५ वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी चौघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. अनिल रताळ असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो बस स्थानकामागील आंबेडकरनगरातील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अनिलने बस स्थानकावरील कॅंटिनमध्ये अकोट फैलमधील रहिवासी राहुल ओंकार त्रिपाठी याच्या भावाला मारहाण केली होती. त्यामुळे राहुलने अनिलच्या विरोधात सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती.

ही तक्रार मागे घेण्यासाठी अनिल सातत्याने राहुलवर दबाव टाकत होता. रविवारी रात्रीही याबाबत चर्चा करण्यासाठीच अनिलने रेल्वे स्थानकावर राहुलला बोलाविले होते.

आधीच भावाला मारहाण, त्यात तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याने राग अनावर झालेल्या राहुलने मित्रांच्या मदतीने रेल्वे स्थानकावरील गेट क्रमांक दोनवरील हॉटेल प्रेसिडंटपुढे अनिलला गाठून त्याच्यावर वार केले. तो बचाव करण्याचा प्रयत्न करीत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांना धाव घेतली. त्यावेळी एक तरूण दुसऱ्याला हातात चाकू घेवून मारहाण करताना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अर्धा तासात चौघांना घटक

रामदासपेठ पोलिस व अकोट फैल पोलिसांनी मिळून आरोपींना अर्धा तासात चार आरोपींना अटक केली. त्यात मुख्य आरोपी राहुल ओंकार त्रिपाठीसह अमर उज्जैनवार, अभिषेक खांडगे, सोनू बनसोड (सर्व रा. अकोट फैल) यांना अटक केली. रामदासपेठ पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक जितेश कानपुरे (आर्थिक गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भांदवि कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT