crop damaged due to heavy rain in nagpur amravati wardha 
विदर्भ

पीक काढण्याचा विचारच करत होता शेतकरी, पण सकाळी शेतात जाऊन बघितलं अन् होत्याचं नव्हतं झालं

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे. अनेकांनी अजूनही गहू काढलेला नाही. त्यातच गुरुवारी विदर्भातील नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारा पडल्या. यामुळे हरभरा आणि गहू या पिकांसोबतच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. त्यामुळे या हंगामावर पोट असणाऱ्या शेतकऱ्यांना आता उन्हाळा काढायचा कसा? असा प्रश्न पडला आहे.

हवामान खात्याने विदर्भात १८ ते २० मार्चदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास आकाशात ढग जमले होते. जवळपास साडेसात वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. नागपूर शहरासह जिल्ह्यात सकाळच्या सुमारास दीड तास जोरदार पाऊस झाला. तसेच वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास तब्बल एक तास पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. वादळासह आलेल्या पावसाने संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांचा शेतमाल पूर्ण भिजला. अमरावती जिल्ह्यातील काटकुंभ परिसरात रात्री साडेसात वाजताच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस पडला तसेच जोरदार गारपीटही झाली. उर्वरित विदर्भात ढगाळी वातावरण होते. 

अमरावतीमधील मेळघाटालाही पावसाने चांगलेच झोडपले. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसातून कापणीसाठी तयार झालेल्या गहू, हरभऱ्यासह इतर अनेत पीकांची नासाडी झाली आहे. याबरोबर उन्हाळी पिके म्हणून शेतात पेरलेल्या मका, मूग आणि भुईमुगाची पेरणी देखील संकटात सापडली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT