Crops of Pigeon pea are getting damaged due to Cold in yavatmal district  
विदर्भ

शेतकरी पुन्हा संकटात! यवतमाळ जिल्ह्यात शीतलहरीचा तुरीवर कहर; उत्पादनावर परिणामाची शक्‍यता

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यात आठवड्याभरापासून शीतलहरीचा कहर दिसत आहे. काही पिकांना लहर पोषक असली तरी जिल्ह्यातील तूर पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तापमान आठ अंशांच्या खाली गेल्यास पिकाचे अन्नपचन खंडित होण्याचा धोका असून, त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची भीती कृषी संशोधन केंद्रातर्फे वर्तविली जात आहे.

खरीप हंगाम अवकाळी पावसाने हातून गेल्यावर रब्बी व तूर पिकावर शेतकऱ्यांची आशा आहे. मात्र, हवामानात झालेल्या बदलामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. सोयाबीन व कापूस अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडले. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना तूर पिकातून काही तरी हाती येईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी शेतकरी काळजी घेत आहेत. मात्र, वातावरणातील बदलामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत येण्याची भीती आहे.

 आठवड्याभऱ्यापासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. दोन दिवसांपासून तापमान नऊ अंशसेल्सिअसवर आले आहे. परिणाम याचा फटका बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तापमान आठ अंशांच्या खाली गेल्यास झाडाचे पर्णपेशी काम करीत नाहीत. त्यामुळे झाडांचे अन्नपचन (मेटॅबोलीझम) खंडित होते. पाने व फांद्या सुकून वाळल्यासारख्या होतात. 

फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये व्हायला खूप काळ लागतो. अथवा ते गळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर यांचा परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. अवकाळी पावसानंतर आता शीतलहरीचा कहर आल्याने हातात आलेले पीक जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या 

शेतात धूर करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

थंडीपासून शेतपिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकाला हलके पाणी द्यावे. पिकावर पोटॅशियम नायट्रेट पावडरची फवारणी 150 ग्रॅम प्रतिदहा लिटर पाणी या प्रमाणात करावी. पहाटे व रात्री शेतात धूर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : कोकण रेल्वेचं नवं ॲप! प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार गाड्यांची माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT