crowd in hotel bar restaurant till late night in amravati  
विदर्भ

हॉटेल, बारमध्ये उशिरानंतरही वर्दळ; पोलिस आयुक्तांच्या अचानक भेटीमुळे ठाणेदारांची तारांबळ

संतोष ताकपिरे

अमरावती :  गुन्हा करून काही गुन्हेगार  हॉटेल, बार किंवा ढाब्यावर आश्रय घेतात. त्या पार्श्‍वभूमिवर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांना काल रात्री अचानक काही हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यावर अचानक भेट दिली असता मध्यरात्रीनंतरही वर्दळ सुरूच दिसली.

पोलिस आयुक्तांच्या अचानक भेटीमुळे संबंधित ठाणेदारांसह, ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शुक्रवारी (ता. 12) रात्री सीपींनी ही कारवाई केली. जिल्हा प्रशासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर हॉटेल, बार, ढाबे, रेस्टॉरंट रात्री दहापर्यंतच ग्राहकांसाठी उघडे ठेवण्याची अनुमती दिली. परंतु, पंचवीस टक्के बार, रेस्टॉरंट, ढाबे किंवा हॉटेलमालक जिल्हाप्रशासनाने दिलेली गाइडलाइन पाळत नाही. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंतही येथे वर्दळ सुरू असते.

संबंधित ठाण्याच्या डीबीस्कॉडसह पोलिस निरीक्षकांना त्याबाबतची परिपूर्ण माहिती असतानाही काही आस्थापना संचालकांना त्यातून विशेष सूट दिली जाते. महत्वाची बाब म्हणजे पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी (ता. 11) गुन्हेविषयक मासिक आढावा बैठकीमध्येच या मुद्याबाबतही पोलिस निरीक्षकांना सूचना केल्या होत्या. परंतु, गाडगेनगर हद्दीत पंचवटी, रहाटगाव व नांदगावपेठ परिसरात बरेच ढाबे, हॉटेल, बार रात्रीपर्यंत सुरूच होते. ग्राहकांचीही येथे वर्दळ झाली. परंतु, पोलिसांनी कारवाई टाळली. पोलिस आयुक्तांना माहिती मिळताच आधी त्यांनी परिसरात संबंधित ठिकाणी आधी भेटी देऊन खात्री केली. त्यानंतर दोन्ही ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना घटनास्थळी बोलावून पाहायला लावले. त्याचठिकाणी पोलिस आयुक्तांनी संबंधितांना सुनावले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT