crowd at road even in strict lockdown in yavatmal
crowd at road even in strict lockdown in yavatmal 
विदर्भ

कडक निर्बंधांमध्येही रस्त्यावर नागरिकांची गर्दी, कोरोना संसर्गाला आळा घालणार कसा?

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : गेल्या वर्षभरापासून कोरोनाला पराभूत करण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन अहोरात्र झटत आहे. मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गात चिंताजनक वाढ झाली. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने "ब्रेक दी चेन'अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्‍यक सेवा वगळता बाजारेपठ बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, नागरिक विनाकारण अजूनही रस्त्यावर गर्दी करून प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासताना दिसत आहेत.

शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने चिंताजनक वाढत आहे. लस आली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. ज्यांनी कोरोनाचा धोका ओळखला ते नागरिक घरात राहूनच काळजी घेत आहे. मात्र, व्हॉट्‌स ऍप विद्यापीठातील "अल्प'तज्ज्ञ कॉपी पेस्ट ज्ञान पाजळत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे नागरिकही द्विधा मानसिकतेत अडकले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सातत्याने कोरोनाशी लढा सुरू आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत कमी झालेल्या आकडेवारीत जानेवारी, फेब्रुवारीत वाढ झाली. मार्च महिन्यात चिंताजनक आकडेवारी वाढली. त्यासाठी टेस्टींगच्या संख्येत झालेली वाढ, हे कारण सांगण्यात आले. सोबतच मृत्यूचा आलेखही वाढतीवरच आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने "ब्रेक दी चेन'अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. बाजारपेठ बंद आहे. शासकीय कार्यालयातही अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. केवळ अत्यावश्‍यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरीदेखील मोठ्या प्रमाणात नागरिक मुख्य रस्त्यावर येऊन गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यावर दिसणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी बघून कडक निर्बंध आहेत की नाही, अशी शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासत रस्त्यावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग रोखणार तरी कसा, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. 

शिस्तीचा डोस आवश्‍यक -
बाजारपेठ बंद, शासकीय कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागतांना प्रवेश बंदी आहे. अत्यावश्‍यक कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे अपेक्षित आहे. तरीदेखील नागरिक विनाकारण वाहनांनी रस्त्यावर येऊन "ब्रेक दी चेन'चा बट्ट्याबोळ करीत आहेत. पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा हातात दंडा घेण्यासह दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणे आवश्‍यक झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT