crowds in Akola City grew again
crowds in Akola City grew again 
विदर्भ

रिकामटेडके रस्त्यावर, शहरातील गर्दी पुन्हा वाढली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत नागरिक रस्त्यावर व बाजारात गर्दी करताना दिसत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली अनेक रिकामटेडके बिनधास्त बाहेर फिरत असल्यचे शुक्रवारी शहरात दिसून आले. त्यामुळे बाजारातील गर्दी टाळण्यासाठी व विशिष्ट अंतर ठेवून व्यवहार करता यावे म्हणून प्रशासनाकडूनच उपाययोजना करण्यात येत आहे.

शहरातील जनता भाजी बाजार, जुना भाजी बाजार, जुने शहरातील शिवाजी नगरातील बाजार, जठारपेठेतील भाजी बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. बाजारात फळ वक्रेत्यांनी अंतर ठेवून हातगाड्यांवर दुकाने थाटली आहेत. मात्र नागरिकांकडून होत असलेल्या गर्दीने व्यापारीही आता हतबल झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. प्रशासनानेही अनेक दुकांनापुढे एक मीटर अंतरावर चौकन आखून दिले आहेत. बाजारातही भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्यांना अंतर ठेवून खरेदी करण्याची विनंती केली जात आहे.

वाहनांच्‍या गर्दीवर नियंत्रण
जनता बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाची गर्दी टाळण्यासाठी बाजारात वाहन घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जुने बस स्थानकाच्या आवारात दुचाकी उभे करून नागरिकांना बाजारात जाण्याची परवानगी दिली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT