विदर्भ

अगरबत्ती, अत्तरच्या कामी येणाऱ्या जिरेनियम पिकाची लागवड

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा कमी कष्टात जादा नफा मिळवून देणाऱ्या आधुनिक शेती करण्याकडे अचलपूर तालुक्यातील शेतकरी वळत आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत विविध शेतकऱ्यांनी शतावरी, ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती केली आहे. आता तर शेतकऱ्यांना ज्या पिकाचे नावही माहीत नाही, अशा औषधी वनस्पती जिरेनियम पिकाची शेती करण्याचे धाडस भूगाव येथील पवन ठाकरे या उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणाने व वडील मधुकर ठाकरे या दोघा पितापुत्रांनी केले आहे.

पारंपरिक पिकांऐवजी काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने अचलपूर तालुक्यातील भूगाव येथील मधुकर ठाकरे यांचा उच्चशिक्षित मुलगा पवन ठाकरे या दोघा पितापुत्रांनी जिरेनियम शेतीचा पर्याय स्वीकारला. जिरेनियम ही एक औषधी वनस्पती आहे. या पिकाला कोणताही रोग होत नाही. त्यामुळे फवारणीचा खर्च कमी होतो. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे उत्पन्न मिळते. जिरेनियम वनस्पतीचे तेल परफ्यूम, अरोमा थेरपी, सौंदर्य प्रसाधनांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते.

जिरेनियमला असलेला मूळचा सुगंध तेलातही उतरतो. त्यामुळे त्याला सौंदर्यप्रसाधने निर्मितीत मोठी मागणी असते. जवळपास १२ ते १३ हजार रुपये लिटर या दराने हे तेल विकले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जिरेनियम पिकाला वन्यप्राणी, पशुपक्षी यांच्यापासून काहीही धोका नाही. एखाद्या वेळेस बुरशीसारखा रोग पडला तर एखादी फवारणी केल्याने ते रोगमुक्त राहू शकते.

एकूण मागणीच्या फक्त दहा टक्के उत्पादन भारतात होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन-चार वर्षे उत्पादन मिळते. सदर पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते. पुन्हा लागवड करण्याची गरजच नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक ताण येत नाही. विशेष म्हणजे हे पीक गवतवर्गीय असल्याने त्याला औषध व इतर खर्च फारच कमी प्रमाणात होतो.

कमी कष्ट व जादा नफा मिळवून देणारी आणि हमखास शेतकऱ्यांच्या दारात लक्ष्मी आणणारी सुगंधी व औषधी जिरेनियम शेती शेतकऱ्यांना सक्षम करेल. म्हणूनच अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावे.
- पवन ठाकरे, जिरेनियम शेती उत्पादक, भूगाव
जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर तयार करण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांनी गटाने एकत्रित येऊन उत्पादन घेतले तर त्यांना फायदा होतो. जिरेनियम शेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
- स्नेहल ढेंबरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांसह उद्धव ठाकरेंना धक्का; राष्ट्रवादी नगरसेवकांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

IPO News: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल! Shiprocket अन् Behari Lal Engineering ची बंपर लिस्टिंग; कुणाला सर्वाधिक रिटर्न?

Nagpur School Bomb Threat: शहरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; संघ कार्यालय, केंद्रीय विद्यालयासह प्रसिद्ध शाळांचा समावेश; बीडीडीएस, श्वान पथकाकडून तपासणी

Marathi News Live Updates : संजय राऊतांची निवडणूक आयोगावर सडकून टीका, काय म्हणाले?

Sunetra Pawar: चिमुकली हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आक्रमक; आरोपीवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी हालचाली

SCROLL FOR NEXT