corona.jpg 
विदर्भ

ग्रामीण भागात संचारबंदी वगैरे काही नायं; आम्ही बिनधास्त फिरतोय

प्रशांत पाटील

शेंबा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कलम 144 व संचारबंदी नियमाचे ग्रामीण भागातून सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात नेहमीप्रमाणे वर्दळीच्या ठिकाणी संचारबंदी लागू झाल्यानंतरही लोक गांभीर्याने ही बाब घेत नसून टोळक्याने फिरणे, जमाव करणे, विनाकारण घरा बाहेर निघून बघणे, असे प्रकार सर्रास सुरू आहे.

यामुळे पोलिस प्रशासन काय करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागात अजूनही ही संचारबंदी पूर्णतः लागू झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रात सुद्धा पाय पसरवायला सुरुवात केली असून, त्या संदर्भात पुरेशी जनजागृती ग्रामीण भागात होत नसल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू संदर्भात लोकांना विचारले असता हा आजार फक्त शहरी लोकांनाच होत असतो असा भाबडा समज लोकांचा आहे.

शासनाने नियुक्ती केलेली डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची यंत्रणा कमी पडत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या सीमा जरी बंद केल्या तरी अजूनही शहरी भागातून लोंढेच्या लोंढे छुप्या मार्गाने गावात येत असून, ग्रामीण भागात अजूनही या आजाराशी दोन हात करण्याची पुरेशी यंत्रणा सज्ज झालेली नसून ग्रामीण भागात पोलिस प्रशासनामार्फत प्रत्येक गावामध्ये मुख्य ठिकाणी एक पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याची गरज दिसत आहे.

झोनलनिहाय पथकाचाच शोध घेण्याची गरज
ग्रामीण भागाकरिता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच परदेशातून, पुणे, मुंबई येथून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी, बाधित रुग्ण शोधण्यासाठी झोनलनिहाय पथक नियुक्त केले आहे. नियुक्त केलेले कर्मचारीच गावात दिसत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. हा एक प्रकारचा कामात निष्काळजीपणाच दिसत आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकारी यांनी तत्काळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT