संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

कटऑफने वाढविली डोकेदुखी, विद्यार्थी विचारत आहेत आम्ही कुठे घ्यायचा प्रवेश?

कृष्णा लोखंडे

अमरावती : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली असून ५ हजार ६३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झालेले आहेत. त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत नियोजित महाविद्यालयांत प्रवेश पक्के करायचे आहेत.

दुसऱ्या यादीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पहिल्या यादीत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाचा कटऑफ यंदा वाढला आहे. सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचा समावेश तसेच अंतर्गत गुणांमुळे वाढलेली टक्केवारी याचा परिणाम कटऑफवर पडला आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असला तरी पहिली यादी रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत ५ हजार ६३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. विज्ञान शाखेकरिता ३ हजार २५३, कलाशाखेतील १२८७, वाणिज्य शाखेतील ९५७ तर एससीव्हीसीसाठी १९० विद्यार्थ्यांना पसंती व गुणांच्या आधारे महाविद्यालये देण्यात आली आहेत.

इनहाउस कोट्यातील प्रवेश आधीच झाले असून १२२४ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत, अशी माहिती प्रवेश समितीचे समन्वयक अरविंद मंगळे यांनी दिली.
यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने अकरावी प्रवेशाच्या गुणवत्तायादीत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या प्रवेशाच्या कटऑफमध्येही वाढ झाली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाचे विद्यार्थीही राज्य मंडळाच्या महाविद्यालयात प्रवेश घेत असल्याने कटऑफ वाढल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये यंदा वाढ झालेली आहे. श्रीशिवाजी महाविद्यालयात खुल्या संवर्गासाठी ९४.४०, ओबीसी ९२ व अनुसूचित जातीसाठी ९० टक्के कटऑफ आला आहे, तर विद्याभारती महाविद्यालयात हाच कटऑफ खुल्या संवर्गासाठी ९०.६, ओबीसी ८९.४ व अनुसूचित जातीसाठी ८७.४ टक्के आहे. बियाणी महाविद्यालय अल्पसंख्याक श्रेणीतील असल्याने तेथील कटऑफ समांतर असून ९२.८ टक्के आहे. दुसऱ्या ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना तीन सप्टेंबर ही प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत आहे.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT