सेक्सटॉर्शन सेक्सटॉर्शन
विदर्भ

‘सायबर’ची नवी प्रणाली ‘सेक्सटॉर्शन’; महिलेचा फोटो वापरून फेक अकाउंट

फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन तंत्रांचा अवलंब केला आहे

सूरज पाटील

यवतमाळ : काही वर्षांत सोशल मीडियाचा (social media) वापर व्यसनाप्रमाणेच वाढला आहे. महिला व पुरुषांचा अधिक वेळ मोबाईलवर जात असल्याने फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन तंत्रांचा अवलंब केला आहे. ‘सेक्स्टॉर्शन’ (Sextortion) या नवीन गुन्हे प्रणालीत धमकी देत गंडा घातला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलचा वापर करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

लोक आता फ्लर्ट व व्हर्च्युअल सेक्स (Flirt and virtual sex) करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेताना दिसतात. व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगचा (WhatsApp calling) महत्त्वाचा आधार घेतला जातो. बहुतांश लोक बऱ्याच वेळा ऑनलाइन लोकांशी भेटतात. मात्र, संवाद कुणाशी झाला, हे माहिती राहत नाही. फ्रॉडर एखाद्या बनावट फेसबुक अकाउंटवरून किंवा इतर तत्सम बनावट सोशल मीडियातून मैत्री करतात. नंतर क्लोज झाल्यासारखे भासवतात.

व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगद्वारे काही दिवस संवाद साधतात. व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला, तर लैंगिक हावभाव करण्यास प्रवृत्त करतात. जाळ्यात ओढण्यासाठी स्त्रीचा वापर मोठा प्रमाणात होतो. तर, काही स्त्रिया पुरुषांना जाळ्यात ओढण्यासाठी अशाप्रकारचे कृत्य करतात. कॅमेऱ्यासमोर लैंगिक हावभाव करताना एकदा व्हिडिओ रेकॉर्ड (Video record) झाला की, तोच व्हिडिओ किंवा फोटो व्यक्तीला शेअर केले जातात.

त्यानंतर धमकी दिली जाते की, अश्‍लील व्हिडिओ आणि फोटो तुझ्या मित्रांना किंवा कुटुंबाला शेअर केले जातील. त्यांच्या या धमकीमुळे लाजिरवाणे वाटते किंवा पश्‍चात्ताप होतो. फ्रॉडरच्या निशाण्यावर सोशल मीडिया वापरणारे तरुण जास्तीत जास्त असतात. समाजात बदनामी होणार, या भीतीने आत्महत्या करण्यापर्यंत पीडित व्यक्ती जाते. अथवा मागणीनुसार पैशांची डिमांड पूर्ण केली जाते.

टोळीही असू शकते

सेक्सटॉर्शनमध्ये अख्खी टोळीदेखील काम करते खूप कमी प्रकरणांमध्ये एखादा व्यक्तीच असा गुन्हा करीत असतो. विशिष्ट टोळ्यांकडून सोशल मीडियाद्वारे लोकांना जाळ्यात ओढले जाते व त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. सरळ मार्गाने पैसे कमविण्यापैक्षा सेक्सटॉर्शन प्रकरणातून सहजपणे पैसे उकळले जाऊ शकतात. हे सायबर गुन्हेगारांनी चांगलेच हेरले आहे.

असे ओढतात जाळ्यात

सायबर गुन्हेगार महिलेचा आकर्षक फोटो वापरून फेक अकाउंट बनवतात. ऑनलाइन चॅट व व्हिडिओ कॉलसाठी आग्रह केला जातो. आक्षेपार्ह स्थितीत ओढण्याचा प्रयत्न केला जातो. ऑडिओ किंवा व्हिडिओ समस्या असल्याचे कारण देत अ‍ॅप इस्टॉल करायला सांगितले जाते. अ‍ॅपमध्ये लपलेला मालवेअर व्यक्तीचे कॉन्टॅक्ट्स व इतर माहिती सायबर गुन्हेगारांना पाठवितो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT