social-media.jpg 
विदर्भ

 लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर सायबरची नजर

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः लॉकडाऊनच्या काळात सायबर विभागाची कारवाई जोरदारपणे सुरू आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात काही गुन्हेगार आणि समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुन्हेगारांना आणि समाजकंटकांना पकडण्यासाठी तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलिस प्रशासनाबरोबर समन्वय साधून सायबर विभाग काम करत असल्याने वऱ्हाडातील अकोला आणि बुलडाणा असे एकूण 6 गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

सध्या लॉकडाऊनच्या काळात टिकटॉक, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये एकूण 161 गुन्हे दाखल झाले आहेत. तर वऱ्हाडातील अकोल्यामध्ये 2 तर बुलडाणा 4 असे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आक्षेपार्ह व्हॉटस्‌ॲप मेसेजेस फॉरवर्ड करणे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी हे दाखल करण्यात आले आहेत. तर या प्रकरणातील सर्वच आरोपीना अटकही करण्यात आली आहे.

व्हॉटस्‌ॲप वापरताना घ्यावयाची दक्षता
चुकीच्या, खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये. आपल्या ग्रुपमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण अजून पुढे कोणालाही पाठवू नये. जर आपण सदस्य असणार्‍या ग्रुपवर काही खोटी ,आक्षेपार्ह बातमी, व्हिडिओज , मेमे किंवा पोस्ट्स येत असतील की, ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशा पोस्ट्सबद्दल सदर ग्रुप ऍडमिनला सांगून तुम्ही नजीकच्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करू शकता.

तुम्ही ग्रुप ऍडमिन, ग्रुप निर्माते असाल तर काय करावे?
ग्रुप स्थापन करताना प्रत्येक ग्रुप सदस्य हा एक जबाबदार व विश्वासार्ह व्यक्ती आहे याची खात्री करूनच त्याला किंवा तिला ग्रुपमध्ये सामील करावे. ग्रुपमधील सर्व सदस्यांना ग्रुप निर्माण करायचा उद्देश व ग्रुपची नियमावली समजावून सांगावी. ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्ट्सचे नियमितपणे परीक्षण करा.परिस्थिती अनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून ओन्ली अ‍ॅडमीन असे करावे. जेणे करून अनावश्यक मेसेज ग्रुपवर टाळता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT