sabhagruh.jpg
sabhagruh.jpg 
विदर्भ

दलित वस्ती ‘सभागृह’ पोहोचले गावा बाहेर!

सकाळ वृत्तसेवा

बार्शीटाकळी (जि. अकोला) : बार्शीटाकळी तालुक्यातील सावरखेड गावामध्ये आमदार निधीमधून बांधण्यात येत असलेले दलित वस्ती ‘सभागृह’ वस्ती किंवा गावात न बांधता संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे तब्बल गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावफाट्या जवळ खासगी व्यक्तीच्या शेतामध्ये बांधण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावाबाहेर बांधत असलेल्या सभागृहाचा नेमका फायदा कोणाला होणार? यामागे कोणाचे षडयंत्र आहे. असे अनेक प्रश्‍न स्थानिक नागरिकांच्या मनात येत आहेत.

खासगी जमिनीवर होत आहे बांधकाम
काही सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा गावातील इतर चांगल्या कामासाठी स्थानिक आमदारांच्या निधीमधून दलितवस्ती सभागृहाचे बांधकाम केले जाते. हे बांधकाम संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या जागेवर बांधल्या जाते. त्याचा फायदा गावातील दलित समाजाला घेता यावा हाच त्यामागचा मुख्य उद्देश असतो. परंतु, बार्शीटाकळी तालुक्यातील सावरखेड गावात मूर्तिजापूर मतदार संघाचे आमदार हरिश पिंपळे यांच्या खासगी निधीअंतर्गत मंजूर करण्यात आलेले दलित वस्ती सभागृह गावात न बांधता गावाच्या बाहेर तब्बल दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावफाट्यावर निहिदा येथील रहिवासी असणाऱ्या परंतु, सावरखेड शेतशिवारातील शेतात बांधण्यात येत आहे. त्यामुळे गावाबाहेर असलेल्या सभागृहाचा फायदा कोणाला होणार? सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांच्या यामागील भूमिका काय आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न स्थानिक नागरिकांना पडले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

निधी देणे आम्हचे काम
ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार प्रक्रिया पार पडते. आम्ही फक्त निधी उपलब्ध करून देतो. जिल्हा परिषद किंवा बी अँड सी मार्फत काम होते. तशी याबाबतही ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार सभागृहाची जागा निश्चित झाली आहे.
-हरिश पिंपळे, आमदार, मूर्तिजापूर.

आमदाराकडे न्याय मागू
याबाबत मला काहीच माहित नाही. आणि माझ्याकडून ग्रामपंचायत स्तरावर कुठलाही ठराव किंवा इतर कुठलीही सहमती घेण्यात आली नाही. त्यामुळ ग्रामपंचायत स्तरावर कोणाला काहीच कल्पना नाही. याबाबत आमदारांशी चर्चा करून त्यांच्याकडेच न्याय मागणार आहे.
-वासूदेवराव अंभोरे, सरपंच, सावरखेड


सरपंच राहतात मंगरुळपीरला
सावरखेड गावात कागदोपत्री राहणारे वासूदेव अंभोरे काही वर्षाआधी थेट जनतेमधून सरपंच पदावर निवडून आले आहेत. परंतु, ते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब गावात न राहता तब्बल तालुका सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात वास्तव्यास आहेत. महिन्यामधून एखाद्यावेळी गावात चक्कर झाला त ते नागरिकांचे नशिब समझावे. त्यांच्या मागे उपसरपंच आणि रोजगार सेवकच सर्वी कामे हाताळताना निदर्शनास आले आहे. काही दाखले किंवा महत्त्वाच्या कामासाठी त्यांना फोन केला तर ते उचलत पण नाहीत. सभागृहाच्या बाबतीतही त्यांची भूमिकाही संशयाच्या भवऱ्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT