file photo
file photo 
विदर्भ

दिवसा पक्ष अन्‌ रात्री अपक्ष 

श्रीकांत पनकंटीवार

भंडारा : विधानसभा निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी वाटपात मोठा गोंधळ झाला. यामुळे पक्षातील काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये द्विधापरिस्थिती निर्माण झाली आहे. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी स्थिती असताना पक्षाशी व आपल्या नेत्याशी गद्दारी न करता कार्यकर्ते दिवसा पक्षाचा; तर रात्री अपक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील स्थानिक नेतेही बुचकळ्यात सापडले आहेत. 

जिल्ह्यात तिन्ही विधानसभा क्षेत्रात पक्षातील बंडखोरांचे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार प्रदीप पडोळे यांच्याविरोधात विद्यमान आमदार चरण वाघमारे, भंडारा विधानसभा क्षेत्रातून युतीचे उमेदवार अरविंद भालाधरे यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर व साकोली विधानसभा क्षेत्रातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्याविरोधात माजी आमदार सेवक वाघाये यांनी दंड थोपटले आहे. यामुळे या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विरोधकांपेक्षा स्वपक्षातील बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांसमोर कुणाचा प्रचार करावा, असा प्रश्‍न निर्माण झाला. पक्षाचा प्रचार केल्यास आपल्या नेत्याशी गद्दारी केल्यासारखे होईल; तर नेत्याला मदत केल्यास पक्षाशी गद्दारी होईल. यामुळे द्विधामनस्थितीत असलेला कार्यकर्त्यांनी नवीन फंडा शोधून काढला आहे. दिवसा पक्षाचा तर रात्री अपक्षाचा प्रचार करून कार्यकर्ते दोघांशी सलोखा साधत आहेत. तुमसर मतदारसंघात भाजप कार्यकर्ते दिवसा भाजप उमेदवार; तर रात्री अपक्ष उमेदवार चरण वाघमारे, साकोली विधानसभा क्षेत्रात दिवसा नाना पटोले तर रात्री बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सेवक वाघाये यांचा प्रचार करीत आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात युतीसोबत शिवसेना नसल्याने अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांचा उघडपणे प्रचार करीत आहेत. पक्षाचा किंवा अपक्षाचा विजय झाल्यास आपले योगदान राहील, असा समज कार्यकर्त्यांचा झाला आहे. 

मतविभाजनाचा फटका पक्षाच्या उमेदवारांना 
बंडखोरीमुळे भाजप, कॉंग्रेसच्या उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसणार आहे. मागील पाच वर्षांत भाजपने सत्ता येताच गावागावांत बूथ तयार करून अनेक कार्यकर्त्यांना जुळविले. मात्र, तेच कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्षाच्या प्रचाराला ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT