विदर्भ

बेपत्ता कुटुंबातील मुलाचा मृतदेह नदीपात्रात; आई-वडिलांचा शोधच नाही

सकाळ वृत्तसेवा

वरोरा (जि. चंद्रपूर) : येथील द्वारकानगरीतील एका कुटुंबातील आईवडील आणि मुलगा असे तिघे १६ जुलैपासून बेपत्ता आहेत. यातील मुलाचा मृतदेह वर्धा नदीत आढळून आला; मात्र अजूनही दोघांचा शोध लागलेला नाही. (Dead-Body-Found-Mother-Father-Not-Found-Chandrapur-Crime-News-nad86)

शहरातील द्वारकानगरीत संजय बापूराव जांभूळकर (वय ४८) हे पत्नी वैशाली आणि मुलगा वेदानत यांच्यासोबत राहत होते. संजय हे एका खासगी कृषी कंपनीत नोकरीला होते. तर, वेदान्तने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. १६ जुलैला सकाळी बाहेरगावी जाण्यासाठी तिघेही दुचाकीने घराबाहेर पडले; मात्र तीन-चार दिवस लोटूनही ते घरी परतले नाही. त्यामुळे संजय यांचा भाऊ रवींद्र बापूराव जांभूळकर यांनी तिघे जण बेपत्ता असल्याची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांचा शोध घेणे सुरू केले. अशात १९ जुलैला एका मुलाचा मृतदेह सोईट गावाजवळील वर्धा नदीपात्रात आढळून आला. तर, २४ जुलैला घुग्गुस येथे महिला-पुरुषाचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी तिन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी भाऊ रवींद्र आणि इतर नातेवाइकांना चंद्रपूर येथे आणले.

नातेवाइकांनी मुलाचा मृतदेह हा वेदान्तचा असल्याची ओळख पटली. मात्र, महिला व पुरुषाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. हे तिघे दुचाकीने नेमके कुठे निघाले होते, वेदान्तचा मृतदेह वर्धा नदीत कसा आला, यामागे घातपात तर नाही ना, याचा तपास वरोरा आणि घुग्गुस पोलिस करीत आहेत.

(Dead-Body-Found-Mother-Father-Not-Found-Chandrapur-Crime-News-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT