Dr. Sushma Tirpude sakal
विदर्भ

Amravati News : शासकीय क्वार्टरमध्ये आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह

मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई प्राथमिक आरोग्यकेंद्र येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

नेरपिंगळाई, (जि. अमरावती) - मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कुजलेला मृतदेह शासकीय क्वार्टरमध्ये आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी ही घटना उघडकीस आली.

डॉ. सुषमा तिरपुडे (वय ४५), असे मृत वैद्यकीय अधिकारी यांचे नाव असल्याची माहिती शिरखेड पोलिसांनी दिली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

डॉ. सुषमा तिरपुडे या एकट्याच शासकीय क्वार्टरमध्ये राहत होत्या. दोन दिवसांपासून त्या फोन उचलत नसल्याने चंद्रपूरच्या त्यांच्या एका मित्राने इंटरनेटवरून नेरपिंगळाई गावातील अन्य डॉक्टरांचा फोन नंबर शोधला. एका खासगी डॉक्टरांचा नंबर त्यांना मिळाला. त्यावर फोन करून डॉ. सुषमा तिरपुडे दोन दिवसांपासून फोन उचलत नसल्याचे सांगितले व चौकशी करून कळविण्याची विनंती केली.

संबंधित खासगी डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये जाऊन चौकशी केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर क्वार्टरमध्ये झोपलेल्या आहेत, असे सांगितले. यावरून खासगी डॉक्टरांनी त्यांचा दरवाजा वाजवून त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद आला नाही. क्वार्टरची खिडकी उघडून आतमध्ये बघितले असता डॉ. सुषमा तिरपुडे बेडवर पडलेल्या होत्या व दुर्गंध पसरली होती.

दरम्यान, नेरपिंगळाईचे पोलिस पाटील राजेश राऊत यांनी शिरखेड पोलिसांना माहिती दिली. पोलिस दरवाजा तोडून आत शिरले. पंचनामा करून मृतदेह शवागारात पाठविला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली.

आरोग्यकेंद्राचा अनागोंदी कारभार

नेरपिंगळाईच्या आरोग्यकेंद्रातून २४ तास सेवा देण्याची यंत्रणा आहे. परंतु येथील महिला डॉक्टर दोन दिवसांपासून रुग्णालयात आल्या नसल्याने कुणी शासकीय क्वार्टरमध्ये जाऊन त्यांना बघण्याची तसदी का घेतली नाही? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अडचणी आल्या. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. परंतु त्या फोन उचलत नव्हत्या. क्वार्टरजवळ बघितले असता मृतदेह कुजलेला आढळला. कुलरही सुरूच होता. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल.

- सचिन लुले, ठाणेदार शिरखेड, जि. अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT