रोशनी दिवटे
रोशनी दिवटे  
विदर्भ

पत्नीचा गळा आवळून मृतदेह फासावर लटकवला

सकाळवृत्तसेवा

कोदामेंढी : दारूड्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बणाव करण्यासाठी मृतदेह फासावर लटकविला. मात्र, शवविच्छेदन अहवालात खून केल्याचे निष्पन्न झाल्यावर आरोपी पतीवर गुन्हा नोंदवून शनिवारी आरोली पोलिसांनी त्यास अटक केली आहे. रोशनी किशोर दिवटे (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे.
मौदा तालुक्‍यातील अडेगाव येथे राहणाऱ्या किशोर विठ्ठल दिवटे (वय 36) यास दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी दुपारी किशोर व रोशनी यांच्यात भांडण झाले. दारूच्या नशेत किशोरने पत्नी रोशनीचा गळा आवळला. यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याने तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव केला.
याकरिता किशोरने तिच्या गळ्यात दोरीचा फास लावून लटकवून ठेवले. यानंतर त्याने तिला उपचाराकरिता कोदामेंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. अरोली पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रामटेक येथे पाठविल्यानंतर रोशनी हिच्या गळ्याभोवती वळ असल्याने पोलिसांचा संशय बळावला. उत्तरीय तपासणीनंतर रोशनी हिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी आरोपी पती किशोर दिवटे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी मृत रोशनीचा भाऊ नीलकंठ झितरुजी राऊत (रा. गांगनेर) याने अरोली पोलिसांत तक्रार केली आहे. पुढील तपास ठाणेदार विवेक सोनवणे करीत आहेत.  
मारहाण न करण्याचे हमीपत्र
किशोर बैलबाजारात दलाली करायचा. दिवसरात्र दारूच्या नशेत असल्याने त्याचे पत्नीशी नेहमीच भांडण व्हायचे. यातून काही दिवसांपूर्वी पत्नी रोशनी मुला-मुलीसह माहेरी गेली होती. तिला आणण्यासाठी किशोर गेला. रोशनीच्या माहेरच्यांनी प्रकरण तंटामुक्ती समितीसमोर आणले. यापुढे पत्नीला शिवीगाळ व मारहाण करणार नाही व असे झाल्यास मी जबाबदार राहील, असे हमीपत्र किशोरने 20 मार्च रोजी लिहून दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT