विदर्भ

स्मशानभूमीत नागरिकांना अचानक आली दुर्गंधी; जाऊन बघताच उडाला थरकाप

सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : तालुक्‍यातील कुडेसावली येथील स्मशानभूमीच्या (crematorium) परिसरात मादी बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना ब्रह्मपुरी (Bramhapuri) वनविभागातील दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत (South division of Forest) येणाऱ्या हळदा बिटातील संरक्षित वनकक्षात गुरुवारी उघडकीस आली. बिबट्याचा मृत्यू नेमके कारण अस्पष्ट असले, तरी पिण्याच्या पाण्याअभावी बिबटाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. (Dead Leopard found at crematorium in Bramhpuri chandrapur)

कुडेसावली येथील स्मशानभूमी ही वन कक्ष क्रमांक 1178 मध्ये आहे. या परिसरात गावातील नागरिक गुरुवारी सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेले. नागरिकांना दुर्गंधी आल्याने परिसरात बघितले असता तिथे बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर दक्षिण वनपरिक्षेत्राधिकारी एल. एस. शहा यांनी घटनास्थळा भेट देऊन पाहणी केली.

घटनेचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरीला पाठविला. मृत बिबट मादी असून, तिचे वय अंदाजे 3 वर्षे आहे. पाण्याअभावी तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज यावेळी वनाधिकाऱ्यांना वर्तविला.

यावेळी ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाळे, दक्षिण वनपरिक्षेत्राधिकारी एल. एल. शहा, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर, वनक्षेत्र सहायक करंडे, वनरक्षक बी. जे. वड्डे उपस्थित होते.

मृत मादी बिबटाचे सर्व अवयव आहेत. पाण्याअभावी तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्‍यता आहे.
- एल.एस. शहा, दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी, ब्रह्मपुरी वनविभाग

(Dead Leopard found at crematorium in Bramhpuri chandrapur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT