dead tiger found in sindewahi of chandrapur
dead tiger found in sindewahi of chandrapur 
विदर्भ

दोन वाघ एकमेकांवर भिडले, लढाईदरम्यान एकाचा मृत्यू

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येणाऱ्या रत्नापूर बिटात शनिवारी (ता. १२) सकाळी एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनविभागातील वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात नवरगाव क्षेत्रात येते. या क्षेत्रात रत्नापूर बिट येते. घनदाट जंगलात व्याप्त असलेल्या या वनपरिक्षेत्रात गेल्या काही वर्षांत वाघांची संख्या वाढली आहे. शनिवारी सकाळी काही शेतमजूर शेतावर जात होते. तेव्हा त्यांना या परिसरात दुर्गंधी येऊ लागली होती. त्यामुळे ते त्या दिशेने गेले. तेव्हा एक वाघ मृतावस्थेत आढळून आला.

या घटनेची माहिती मजुरांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या चमूसह रत्नापूर बिटात आले. घटनास्थळाची पाहणी केली. मृत वाघ हा पाच ते सहा वर्षांचा आहे. दोन वाघांच्या झुंजीत त्या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : धक्कादायक! PM मोदी ५ हजार मतांनी पिछाडीवर तर राहुल गांधी 8718 मतांनी आघाडीवर

Lok sabha nivadnuk nikal 2024 : काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर; इंडिया आघाडी अनपेक्षित यशाकडे

Lok Sabha Election Result: 400 पारचा नारा स्वप्नच? NDA च्या जागा होतायत कमी, इंडिया आघाडीची जोरदार टक्कर

Maharashtra Lok Sabha Election Results Live : छ. संभाजीनगरमधून जलील ३ हजार मतांनी आघाडीवर

Share Market Opening: लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर; शेअर बाजार उघडताच कोसळला

SCROLL FOR NEXT