Death of a construction worker in Amravati
Death of a construction worker in Amravati 
विदर्भ

मजूर काचा घेऊन बांबूवर चढला अन्‌ वाहिनीवर कोसळला... 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील एका हॉटेलचे रिनोव्हेशनचे काम सुरू आहे. यासाठी ठेकेदाराने मजुरांना कामावर लावले आहेत. ठेकेदाराने हॉटेल बाहेर बांबू बांधून काम सुरू आहे. मात्र, काम करणाऱ्या एक मजूर या बांबूवरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. 

अमरावती येथील एमआयडीसी मार्गावरील संजय छाबडा यांच्या लॉर्डस हॉटेल ऍण्ड बारमध्ये काम सुरू आहे. ठेकेदाराने काही मजुरांना येथे कामावर लावले असून, मजुरांना वर चढण्यासाठी बांबू बांधले आहे. बुधवारी (ता. 25) रामदास वानखडे (वय 55 रा. बजरंगटेकडी, अमरावती) हे काचा लावण्यासाठी बांबूवरून वर चढले. ते व्यवस्थीत कामही करीत होते. 

मात्र, काचा लावत असताना अचानक वानखडे यांचा तोल गेला. ते बांबूवरून घसरून विजेच्या वाहिनीवर नंतर खाली कोसळले. वहिनीवर कोसळ्याने ते 60 टक्के जळाले. तसेच खाली पडल्याने गंभीर दुखापतही झाली. वानखडे यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व तेथून शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (ता. 30) पहाटे सहाच्या सुमारास खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 

शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय पाठविण्यात आला. घटनेनंतर मृत वानखडे यांच्या नातेवाइकांसह समर्थकांनी राजापेठ ठाण्यावर धडक दिली. पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासोबत चर्चा केली. हॉटेल मालक संजय छाबडासह संबंधित कंत्राटदाराने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पोलिस ठाण्यात चर्चेच्या वेळी नातेवाइकांनी केली. 

शवविच्छेदनास विलंब

मृत मजुराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांसह समर्थकांनी घेतली. त्यानंतर कंत्राटदार, हॉटेलमालक यांच्यातील चर्चेनंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर हा पेच सुटला.

काळजी घेण्याची गरज

घर, हॉटेल आदींचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदार मजूर आणत असतात. कोणी रोजंदारीने बांधकामाच्या ठिकाणी कामावर येतो तर कोणी एकाच ठेकेदाराकडे कामाला असतात. रोजंदारीवरचे मजूर काम संपल्यानंतर पैसे घेऊन निघून जातात. दुसऱ्या दिवशी येणार किंवा नाही याची यात्री नसते. मात्र, ठेकेदाराने मजुरांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे असताना दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतेच नियोजन केले जात नाही. पैशांची गरज असल्याने मजूरही याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ठेकेदारासह मजुराने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT