Yavatmal  sakal
विदर्भ

Yavatmal : खासगी वीज कामगाराचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी केला मारवाडमध्ये रस्ता रोको

माळपठारील रोहडा, बेलोरा, मारवाडी विद्युत विभागाच्या बीटमध्ये विजेच्या खांबावर काम करीत असताना रविवारी (ता.२३) खासगी वीज कामगाराचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : माळपठारील रोहडा, बेलोरा, मारवाडी विद्युत विभागाच्या बीटमध्ये विजेच्या खांबावर काम करीत असताना रविवारी (ता.२३) खासगी वीज कामगाराचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. नामदेव पांडुरंग मार्कंड ( वय ३५ वर्षे रा. बेलोरा) असे मृत वीज कामगाराचे नाव आहे.

वीज विभागाच्या लाईनमनच्या हलगर्जीपणामुळे या कामगाराचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करीत रस्ता रोको केला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास रोहडा गावच्या हद्दीत पुलाजवळ विजेचे काम करण्यासाठी नामदेव मार्कंड हा विजेच्या खांबावर चढला.

त्याला ऑपरेटरने कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा सुरू केल्याने या कामगाराला विजेचा धक्का लागून त्याचा खांबाला चिटकून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी गर्दी करून मारवाडी फाट्यावर रास्ता रोको केला. मृत्यूच्या कारणाचा योग्य तपास लागल्याशिवाय मृतदेह जाग्यावरून हलविण्यास नातेवाइकांनी विरोध केला.

यावेळी खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मृतदेह उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्याची विनंती केली. परंतु नागरिकांनी विरोध करीत जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविला जाणार नाही, असे ठणकून सांगितले.

विशेष म्हणजे यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंता तसेच शाखा अभियंता यांनी घटनेच्या ठिकाणी भेटसुद्धा दिली नाही. त्यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT