Death Death
विदर्भ

चौथ्या बाळाचा जन्म; मात्र, रुग्णवाहिकेत बाळासह मातेचा मृत्यू

बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : प्रसूतीसाठी यवतमाळ येथे आणत असताना रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती झाली. मात्र, नवजात शिशूसह महिलेचा यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १८) रात्री १२ वाजता घडली. मनीषा उमेश पिंपळे (वय २६, रा. लोनबेहळ) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

उमेश पिंपळे व पत्नी मनीषा तीन चिमुकल्यांसह दोन महिन्यांपासून रोजमजुरी व सोयाबीन काढणीसाठी पांढरकवडा तालुक्यात गेले होते. पत्नी गर्भवती असल्याने प्रसूतीसाठी रविवारी गावी परत आले. सोमवारी सकाळी ११ वाजता लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. दुपारी चारपर्यंत प्रसूती होईल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंत प्रसूती झाली नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी महिलेला यवतमाळला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

रुग्णवाहिकेत मनीषासह तिचे नातेवाईक व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे हेदेखील आले. रात्री साडेनऊ वाजता रुग्णवाहिकेतच जवळा गावाजवळ महिलेची प्रसूती झाली. यावेळी नवजात शिशूसह महिलेला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

महिलेवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मंगळवारी वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन झाल्यावर शोकाकुल वातावरणात लोणबेहळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेच्या पश्‍चात पती उमेश पिंपळे, मुलगी खुशी (वय सहा), प्रिया (वय चार), मुलगा यश (वय दोन) असा आप्तपरिवार आहे.

माझ्या पत्नीचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मला काहीच सुचत नाही. पुन्हा काही बोलण्याची मानसिकताही नाही.
- उमेश पिंपळे, मृत महिलेचा पती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT