विदर्भ

दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू; दोघांचा जीव वाचला

सकाळ वृत्तसेवा

दारव्हा (जि. यवतमाळ) : येथील उत्तरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. गोपाल रमेश आसोले (१२)  व रोहित गौतम हटकर (१३) दोघेही राहणार श्रीकृष्णनगर असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहराच्या श्रीकृष्णनगर परिसरातील रहिवासी दोन सख्या भावासह एकूण चार मुले शहरापासून जवळपास २ किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर रविवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. चौघांनी नाल्यातील डोहात उड्या मारल्या. परंतु, डोहात गाळ व पाणी जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नव्हते.

मुले जिवाच्या आकांताने तडफडत असताना नाल्याच्या काही अंतरावर शेतात काम करीत असलेल्या प्रतीक फेंडर याच्या ही बाब लक्षात आली. त्याने नाल्याकडे धाव घेतली. पाण्यात उडी मारून गुलशन रमेश आसोले व वेदांत अमोल पंचबुद्धे या दोघांना वाचवण्यात त्याला यश आले. ही वार्ता माहीत होताच शहरातील सर्पमित्र विनोद वांड्रसवार, चेतन कुकडे, रोहित ढोरे, ऋषिकेश कांबळे, शुभन कटनकर, शिवम दुधे, गोलू भडके आदींसह काही युवक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन गाळात फसलेल्या मुलांना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ केली. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून गुन्ह्याची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिर गाभारा संवर्धन पूर्ण; आजपासून दर्शन सुरू

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT