Crime News sakal
विदर्भ

औषध घेत नाही म्हणून पत्नीला मारलेली थापड ठरली जीवघेणी

सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : औषध घेत नाही म्हणून पतीने पत्नीला थापड मारली. यात पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी मुलेटीपदीकसा येथे समोर आली. सुबायबाई सुभाष दुर्वे (वय ३५, रा. मुलेटीपदीकसा) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबायबाई दुर्वे या कित्येक दिवसांपासून आजारी होत्या. तब्येत बरी होण्यासाठी वेळेवर औषध घेत नाही म्हणून रागावून पती सुभाष दुर्वे यांनी पत्नीला थापड मारली. त्यामुळे आजारी पत्नी खाली कोसळून पडली. प्रकृती अजून खालावत असल्याचे बघून सुबायबाईला ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे आणण्यात आले.

परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले करीत आहेत. सुबायबाईला दोन मुले व एक मुलगी आहे. तिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय कोरची येथे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : 'इलेक्शन ऐवजी थेट सिलेक्शन करा'! निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे वैतागले

Man With 1638 Credit Cards: बापरे! या माणसाकडे आहेत तब्बल 1,638 क्रेडिट कार्ड्स; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये नोंद!

Latest Marathi News Live Update : 2024 नंतर जी यादी जाहीर केली त्यात फक्त नाव आहेत- राज ठाकरे

IND vs PAK: क्रिकेटमध्ये नो हँडशेक पण, हॉकीच्या मैदानात भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये 'हाय-फाईव्ह'

Solapur Fraud: 'साखळी पद्धतीने पैसे गुंतवायला सांगून फसवणूक'; पाच जणांना २८ लाखांना गंडवले, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT