Death of a trainee student of Gondia Nursing 
विदर्भ

पंधरा दिवसांपासून तिची प्रकृती होती खराब, प्रशासनाने सुटीच्या अर्जाकडे केले दुर्लक्ष अन्...

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात शासकीय नर्सिंग कॉलेजअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या तेढवा येथील शुभांगी गजानन बांगरे (वय २२) हिचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेनंतर नर्सिंगच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संताप व्यक्त करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दुपारी तीननंतर आंदोलन केले. प्रकृती खराब असताना रुग्णालय प्रशासनाने सुटी मागूनही शुभांगीला सुटी दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत जीएनएम हे नर्सेस प्रशिक्षण सुरू आहे. जीएनएमचे प्रशिक्षण व याच काळात रुग्णालयात सेवा देण्याचे काम शुभांगी बांगरे करीत होती. तिची प्रकृती १५ दिवसांपासून बिघडली होती. तिने सुटी मिळावी म्हणून रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती. सुटीचा अर्जदेखील केला होता. परंतु, तिचे कोणीही ऐकले नाही. त्यामुळे ती प्रकृती बरी नसूनदेखील रुग्णालयात रुग्णसेवा करीत होती.

दरम्यान, शुभांगीची प्रकृती अजून खालावल्याने तिचा शनिवारी केटीएस रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारानंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केले. प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रेटून धरली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

चौकशीसाठी समिती तयार 
या घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. 
- डॉ. विनायक रुखमोडे, 
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया

 संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

Paduka Darshan Sohala : संत आदर्शांचे अनुसरण हीच खरी गुरुभती; स्वामी स्वरूपानंद यांचे प्रतिपादन

UP News: “झाडे आहेत तरच आयुष्य आहे!” योगी आदित्यनाथ यांचा ग्लोबल वॉर्मिंगवर इशारा; वनसंवर्धनावर भर...

SCROLL FOR NEXT