The death of a young man in a fatal attack 
विदर्भ

रात्री प्रेयसीच्या घरात घुसला अन् जीवाने गेला

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जिल्हा बुलडाणा) : तालुक्यातील सावळा येथे रात्रीचे वेळी घरात घुसल्यावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना 4 फेब्रुवारी रात्री घडली. यामध्ये 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तामगाव पोलिसांनी आठ आरोपी विरुद्ध कलम 302 सह गुन्हे दाखल केले आहेत.


याबाबत प्राप्त माहितीनुसार, सावळा येथील ज्ञानेश्वर उर्फ भैय्या घिवे हा तरुण गावातीलच प्रभाकर धूळ याचे घरात घुसण्यावरून वाद उद्‍भवला. यातील मृतक हा 4 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास घरात घुसल्याचे समजताच त्याला प्रभाकर धूळ याने कुऱ्हाडच्या दांड्याने जबर मारहाण केली व इतर सात नागरिकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मृतकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला मारहाण करणाऱ्यांनीच वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात बैलगाडीत टाकून आणले. मारहाण जास्त असल्याने वरवट वरून त्याला शेगाव हलविण्यात आले. या दरम्यान ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद 5 फेब्रुवारीला मृतकचे वडील देवेद्र घिवे यांनी तामगाव पोलिस स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी प्रभाकर धूळसह एकाच कुटुंबातील सात असे आठ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

 मारहाणी नंतर आणले रुग्णालयात
‘त्या’ तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनीच जखमी अवस्थेत वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात बैलगाडीत टाकून आणले. मारहाण जास्त असल्याने वरवट वरून त्याला शेगाव हलविण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

सैराट फेम अरबाज शेख अडकला लग्नबंधनात; गर्लफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला निकाह, होतोय अभिनंदनाचा वर्षाव

Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

Latest Marathi News Live Update : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

SCROLL FOR NEXT